तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रभाग क्रमांक सात ब मध्ये अपक्ष उमेदवार (राष्ट्रवादी पुरस्कृत) संगीता राजेंद्र शेळके या 795 मतांनी विजयी झाल्या. त्यांना 1452 मते पडली तर त्यांचे प्रतिस्पर्धी कृष्णा मारुती म्हाळस्कर यांना 657 मते पडली. संगीता शेळके यांना विजयी घोषित करण्यात आले. भाजपाचे तत्कालीन नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीसाठी एकूण 54.68 % इतके मतदान झाले.
तळेगाव नगरपरिषद पोटनिवडणूकीमध्ये महाविकासआघाडीच्या संगीता शेळके विजयी
0
12:22