मोबाईल चोरीच्या प्रकरणाचा दिंडोशी पोलिसांकडून पर्दाफाश; ₹१.१५ कोटींचे १,१५० मोबाईल मदरबोर्ड जप्त!
मुंबई : मोबाईल चोरीच्या प्रकरणात दिंडोशी पोलिसांनी महत्त्वपूर्ण कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईदरम्यान नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एका भंगार गोदामातून अंदाजे १ कोटी १५ लाख रुपये किमतीचे १,१५० मोबाईल मदरबोर्ड जप्त करण्यात आले आहेत.
मुंबईसह इतर भागांतून चोरीला गेलेल्या किंवा हरवलेल्या मोबाईल फोनच्या अनुषंगाने पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. जप्त करण्यात आलेले मोबाईल मदरबोर्ड नेमके कोणत्या मोबाईलमधील आहेत, तसेच त्यांचा चोरीच्या घटनांशी काय संबंध आहे, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
या कारवाईमुळे मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांमागील संभाव्य साखळी उघड होण्याची शक्यता आहे. दिंडोशी पोलिसांच्या या कारवाईकडे मोबाईल चोरीच्या प्रकरणांच्या तपासातील महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
पुढील तपास दिंडोशी पोलीस करत आहेत

