अवैध गुटखा विक्रेत्यांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक, 5 लाखांचा गुटखा जप्त

0 झुंजार झेप न्युज

पुण्यात चाकण पोलीस अवैध गुटखा विक्रेत्यांवर सर्जिकल स्ट्राईक सुरु आहे.

पुणे : पुण्यात चाकण पोलीस अवैध गुटखा विक्रेत्यांवर सर्जिकल स्ट्राईक सुरु आहे. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दी बाहेरुन गुटखा जप्त करण्यात आला आहे. त्यासोबतच टेम्पो ही जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत तब्बल 5 लाख 18 हजार रुपयांचा गुटखा आणि साडे तीन लाखाचा टेम्पो असा एकूण पावणे नऊ लाखाचा मुद्देमाल चाकण पोलिसांनी जप्त केला आहे.

चाकणमधील नाणेकरवाडी येथे एका पान टपरीवर कारवाई करुन पोलिसांनी 8 हजार 850 रुपयांचा गुटखा जप्त केला होता. या कारवाईत गुटखा विक्रेता आरोपी नीरज बन्सल याला ताब्यात घेऊन गुटख्याच्या पुरवठादार याबाबत चौकशी केली होती. तेव्हा आरोपी अंकुर गुप्ता यांच्याकडून गुटखा आणल्याचे आरोपी बंसल यांनी सांगितले. त्यानुसार शिरूर तालुक्यातील जातेगाव खुर्द येथून पोलिसांनी मोकळ्या जागेतून आरोपी गुप्ता यांचा तीन चाकी टेम्पोसह गुटखा जप्त केला आहे.

नीरज बंसल याला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. तर, मुख्य आरोपी अंकुर गुप्ता सध्या फरार आहे.

नांदेडमध्येही 41 लाखांचा गुटखा जप्त

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात एका ट्रकमधून जाणारा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुटखा भरलेला ट्रक जप्त करण्यात आला आहे. या धाडीत पोलिसांनी एकूण 41 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे माफियांनी हा गुटखा कापसाच्या आड लपून ठेवला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.