विहामांडवा येथील दारूची भट्टी उध्वस्त करण्यात आले आहे.
विहामांडवा:(किशोर धायकर पैठण प्रतिनिधी) आज रोजी माहिती मिळाली की विहामंडवा शिवारात सुभाष देवराव गायकवाड यांचे व त्याचे साथीदारचे शेतात मोठ्या प्रमाणात गावठी दारू चा कारखाना चालू आहे व 3 दिवसापासून गावठी दारू बनवणे चालू आहे त्यावरून आम्ही सपोनि सुरवसे सोबत पोना गोरखनाथ कणसे ,पोना धांडे ,पोना माली, पोना फोलने pc मुळे, pc पाटेकर, pc 237 गुढेकर तसेच होमगार्ड यांचे सोबत छापा मारला असता अंदाजे 3000 लिटर दारूचे रसायन गूळ नवसागर 19 ड्रम 50 लिटर गावठी ताजी दारू तसेच 5 आरोपी नामे सुभाष गायकवाड, सुरेश फुलरे, दीपक तुपे, बबन मिसाळ, विष्णू ढगे असे मिळून आले तसेच एक जण आरोपी फरार झाला आहे.तीन मोटार सायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाइ मा पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गोरख भामरे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

