प्रभाग क्रमांक 23,धनगर बाबा मंदिराच्या मागे संत ज्ञानेश्वर कॉलनी, थेरगाव हॉस्पिटलच्या मागे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत काम चालू असून ठेकेदार व इंजिनीअरच्या आशीर्वादामुळे एका दहा वर्षाच्या मुलाच्या जीवावर बेतले आहे.

0 झुंजार झेप न्युज

प्रभाग क्रमांक 23,धनगर बाबा मंदिराच्या मागे संत ज्ञानेश्वर कॉलनी, थेरगाव हॉस्पिटलच्या मागे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत काम चालू असून ठेकेदार व इंजिनीअरच्या आशीर्वादामुळे एका दहा वर्षाच्या मुलाच्या जीवावर बेतले आहे. 

पिंपरी चिंचवड,दि.2 : दि. 26/9/2021 रोजी हा अपघात घडला असून त्याची तक्रार महानगरपालिकेचे आयुक्त श्री. राजेश पाटील यांना राष्ट्वादी काँग्रेस सफाई कामगार सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव युनुस पठाण यांनी केली असता आज पर्यंत त्यांच्या तक्रारीचा विचार करण्यात आला नाही. व ठेकेदार व इंजिनियर वर कोणतीही कारवाई महानगरपालिकेने त्यांच्या वर केलेली नाही. महानगरपालिकेचे प्रशासन कोणतीही प्रकारची दखल घेत नसण्याने श्री युनुस पठाण यांनी सफाई कर्मचारी आयोगाचे मंत्री माननीय. श्री.पी.पी.पावा यांना पत्र देऊन लवकरात लवकर ठेकेदार व इंजिनियर वर कारवाही चे आदेश महानगरपालिकेने लवकरात लवकर करून ,त्या जख्मी मुलाला खर्चा सकट नुकसान भरपाई द्यावी ही विनंती केली आहे. या अर्जा द्वारे त्यांनी मुलाला लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा श्री.युनुस पठाण यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.