नाना-नानी पार्क व कत्तलखान्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

0 झुंजार झेप न्युज

नाना-नानी पार्क व कत्तलखान्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

कोल्हापूर,दि.31: कागल नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या नाना-नानी ऑक्सीजन पार्क आणि अत्याधुनिक स्वरुपातील लहान जनावरांचा कत्तलखाना या दोन्ही उपक्रमांचे लोकार्पण पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.

 कागल नगरपरिषदेच्या वतीने घनकचरा प्रकल्प परिसरात सुमारे 1 कोटी 35 लाख रुपये खर्च करुन हा अत्याधुनिक कत्तलखाना तर सुमारे 90 लाख रुपये खर्च करुन नाना-नानी ऑक्सीजन पार्कची उभारणी कागल शहरातील जनतेसाठी करण्यात आली. 

यावेळी हे दोन्ही प्रकल्प नितांत सुंदररित्या उभे करण्यात आले असल्याची भावना पालकमंत्र्यांनी बोलून दाखविली. याप्रसंगी कागलच्या नगराध्यक्षा माणिक माळी, प्रताप माने, प्रकाश गाडेकर, नपा मुख्याधिकारी पंडीत पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक-सेविका आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.