दरोडा विरोधी पथकाकडून बनावट नोटा तयार करणारी टोळी गजाआड

0 झुंजार झेप न्युज

•एकूण 2,97,800 रुपयांच्या बनावट चलनी नोटा व नोटा छापण्याची साहित्य जप्त

पिंपरी चिंचवड: मा.पोलीस आयुक्त श्री. कृष्णप्रकाश सो यांनी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीमधील कोणतेही अवैध धंदे चालणार नाही याबाबत कारवाई करणेकरिता वेळोवेळी सूचित करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीमध्ये काही गुन्हेगार हे दिवाळी सणमुळे खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत होणारी गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमारी चेनस्नॅचिंग, चोऱ्या करून बाजारा मध्ये मोठ्या प्रमाणात गोरगरिबांना फसवणूक करतात अथवा खोट्या नोटा चालविण्याचा प्रयत्न करतात अशी माहिती दरोडा विरोधी पथकास मिळाली होती. त्याप्रमाणे अशाप्रकारे गुन्हे करणारे गुन्हेगारांची माहिती घेतली, यापूर्वी निगडी,भोसरी तसेच संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर व पुणे शहर आयुक्तालयातील अशा गुन्हेगारांची माहिती प्राप्त करण्यात आली. पिंपरी कॅम्प, पिंपरी मार्केट तसेच भोसरी मार्केट परिसरामध्ये अशा नोटा सदर गुन्हेगार चालविणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. त्याप्रमाणे सदर परिसरांमध्ये बातमीदार तयार करून तसेच दिवाळीनिमित्त लावणारी स्टॉल चालक यांना माहिती देऊन बातमी तयार करण्यात आली.दि.28/10/2021 रोजी महात्मा फुले झोपडपट्टी,डी वाय पाटील कॉलेज शेजारी,पिंपरी, पुणे येथे एक इसम हा बनावट नोटा घेऊन येणार असल्याची व ते बाजारात घेऊन जाऊन गोरगरिबांच्या स्टॉलवर चालून त्याची फसवणूक करणार असल्याची बातमी पोलीस अमलदार सुनीता देवकर व गणेश सावंत यांना मिळाली. च्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.उत्तम तांगडे यांनी सहा.पोलीस निरीक्षक श्री.सिद्धेश्वर कैलासे,पो.हवा.702 उमेश पुलगम पो.ना 1062 गणेश हिंगे,पो.शि.2673 सुमित देवकर,पो.शि.2643 गणेश सावंत,पो.शि.2947 विनोद वीर पो.शि.2055 समीर रासकर व पो.शि.2865 अमर कदम असे पथक तयार करून योग्य सूचना देऊन सदर बातमीची खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे वर नमूद पथकास महात्मा फुले झोपडपट्टी,पिंपरी,पुणे येथे मिळालेल्या बातमीप्रमाणे एक संशयीत इसम बाजारामध्ये मिळून आला,त्यास ताब्यात घेतली. त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने गणेश दादू जाधव वय-32 वर्ष,रा. महात्मा फुलेनगर,डी.वाय.पाटील कॉलेज मागील बाजू.घर नं.45 एम.आय.डी.सी. भोसरी पुणे 411026 असे असल्याचे सांगितले. त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एकूण 9,600 रुपयाच्या 200 रुपये दराने एकूण 48 चलनी नोटां सारख्या दिसणाऱ्या नोटा यामुळं आले. सदर नोटा पडताळल्या आसता त्यावरील अक्षरांची साईज, महात्मा गांधी यांचा फोटो व नोटा मध्ये असलेली तार व एकाच नंबराच्या काही नोटा मिळून आल्याने त्या बनावट असल्याची खात्री झाली.त्याबाबत पोलीस अमलदार विनोद वीर यांनी फिर्याद दिल्याने एम.आय.डी.सी भोसरी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर गुन्हा रजिस्टर 592/2021 भा.द.वि कलम 489 (बी)489 (सी) प्रमाणे अन्वये दि.28/10/2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास हा दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक श्री.सिद्धेश्वर कैलास यांनी सुरू केला असता आरोपी गणेश दादू जाधव याचे घरझडती मधून देखील एकूण 11,200 रुपये त्यात 200 रुपये दराच्या एकूण 56 बनावट चलनी नोटा या जप्त करण्यात आले. सदर गुन्ह्याचा सखोल तपास केला असता आरोपी कपिल नसीम शेख उर्फ कपिल भाई वय-31 वर्ष,रा. हुसेनिया कॉम्प्लेक्स, फ्लॅट नं.10, औरंगाबाद तसेच हडमत बाबुसिंग राजपुरोहित वय -31, रा.कठफळ गाव,ता. बारामती जि.पुणे मूळ रा.-गाव आहोर,पोस्ट-निमला,जी.जालोर रा-राजस्थान श्रीकांत सदाशिव माने वय-32 वर्ष,रा.खंडोबानगर, सदाजय आपारमेंट, बारामती पुणे व गणेश सुधाकर मुळे वय-32 वर्ष,रा.तांदुळवाडी रोड , मयुरी बिल्डिंग समोर,पुणे या सर्वांनी मिळून मागील दोन ते तीन महिन्यांमध्ये सदर बनावट नोटा तयार केल्या असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुषंगाने कफील भाई याचा शोध घेण्यासाठी वर नमूद पथकाने दोन दिवस रोशन गेट, औरंगाबाद या ठिकाणी सापळा रचून वेषांतर करून त्यास ताब्यात घेण्यात आले. त्यास ताब्यात घेऊन दि.01/11/2021 रोजी अटक करून तपास मध्ये त्यांनी मोहम्मदवाडी, कोंढवा पुणे. येथे त्याचे घरी बनावट नोटां करिता वापरलेले साहित्य व त्याच्याकडे असलेल्या नोटा या लपवून ठेवल्या असल्याचे समजले. त्याप्रमाणे आरोपी कपिल शेख याचे कडून खालील प्रमाणे साहित्य व नोटा मिळाल्या 

1. एक कॅनॉन कंपनीचा कलर प्रिंट

2. एक इक्सॉंन कंपनीचा प्रिंटर व एक कीबोर्ड 

3. दोन ट्रान्सफरन्ट प्लास्टिकचे पेपर त्यामध्ये महात्मा गांधी चा फोटो चेक कात्रण व तारेचे कात्रण 

4. एक प्लास्टिक पेपर व ट्रेस पेपरचा गठ्ठा, एक पेपर कटिंग बोर्ड, पाच लोखंडी फूट पट्ट्या.

5. नोटा छापण्यासाठी वापरता येणारा कागदाच्या 6 रीम 

6. हिरवा कलर टेप,चमकीचे पेन

7. कटर,ब्लेड बॉक्स,नीडल,रबर, स्क्वीझी पॅड,कात्री,माऊस, केबल ,प्लास्टिकचा एक्सटेन्शन बोर्ड व स्क्रीन स्टेन्सिल फिल्म पेपर ,

8.500 रुपये दाराचे 16 बनावट चलनी नोटा 

9.2000 रुपये दराचे 3 बनावट चलनी नोटा

10.2000 रुपयाचे एका बाजूस प्रिंट असलेले 40 बनावट चलनी नोटा 

11.200 रुपये दराचे 100 चलनी नोटा

12.200 रुपये दाराचे 69 बनावट चलनी नोटा 

13. रुपये दराचे रुपये 13 बनावट चलनी नोटा 

14,43 ए 4 साईज चे पेपर त्यावर 2000 रुपये चे नोटाची पॅन्ट असलेले 

15.56 ए 4 आईज साईज चे पेपर त्यावर 500 रुपये चे नोटाचे प्रिंट असलेले 

16.73 ए 4 साईज चे पेपर त्यावर 200 रुपये चे नोटाचे प्रिंट असलेले

17.9 ए 4 साईज चे पेपर त्यावर 100 रुपये चे नोटाचे प्रिंट असलेले

18.2 ए 4 साईज चे पेपर त्यावर 100 रुपये चे जुन्या नोटाचे प्रिंट असलेले

   असे एकूण 50 हजार 400 रुपया बनावट भारतीय चलनी नोटा व 50,000 रुपयांचे नोटा छापण्याची साहित्य मिळून आले. त्यानंतर सदर गुन्ह्यांमध्ये भा.द.वि.क.489 (अ) व 489(ड) व ,34 या कलमांचा अंतर्भाव करण्यात येऊन पुढील तपास करण्यात आला. सदर तपासामध्ये सदर नोटा बनविणारे आरोपी हडमतसिंग राजपुरोहित, श्रीकांत माने व गणेश मुळे यांचा देखील शोध घेऊन त्यांस देखील दि.01/11/2021 रोजी अटक करण्यात आली. आरोपी हडमतसिंग राजपुरोहित यांच्याकडे तपास केला असता त्याने बारामती येथे कठफळ गाव येथे त्याच्याकडे असलेल्या बनावट चलनी नोटा या लावून ठेवले असल्याची निष्पन्न झाले त्याप्रमाणे कठफळ गाव येथून खालील प्रमाणे एकूण 71.800 रुपयाच्या बनावट चलनी नोटा जप्त करण्यात आल्या.

1.500 रूपये दराच्या 108 बनावट चलनी नोटा

2.200 रुपये दाराचे 88 बनावट चलनी नोटा 

3.100 रुपये दराचे 02 बनावट चलनी नोटा 

तसेच आरोपी श्रीकांत माने याच्याकडे तपास केला असता त्याने बारामती येथे माळशिकारे वस्ती येथे असलेल्या त्याच्या घरांमध्ये त्याच्याकडे असलेल्या बनावट चलनी नोटा लपवून ठेवले असल्याचे निष्पन्न झाले त्याप्रमाणे त्याच्याकडून खालील प्रमाणे एकूण 55,300 रुपयाच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.

1.500 रुपये दराचे एकूण 101 बनावट चलनी नोटा

2.200 रुपये दराचे एकूण 24 बनावट चलनी नोटा

तसेच आरोपी गणेश मुळे याच्याकडे तपास केला असता त्याने बारामती येथे तांदुळवाडी येथे त्याचे राहते घरी त्याच्याकडे असलेल्या बनावट भारतीय चलनी नोटा या लपून ठेवले असल्याचे निष्पन्न झाले त्याप्रमाणे त्याच्याकडून खालील प्रमाणे एकूण 99,500 रुपये बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.

1.500 रुपये दराचे एकूण 199 बनावट चलनी नोटा

अशाप्रकारे वर नमूद आरोपीकडून पुढील प्रमाणे चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

1.2000 रु दराच्या एकूण 03 नोटा

2.500 रु दाराच्या एकूण 424 नोटा

3.200 रु. दराच्या एकूण 398 नोटा

4.100 रु दाराचे एकूण 02 नोटा

एकूण 02,97,800 रुपयाच्या बनावट चलनी नोटा व 50,000 रुपयाचे नोटा छापण्याची साहित्य जप्त करण्यात आले

सदर आरोपी हे पैसे कमवण्याच्या उद्देशाने पंचवीस ते तीस हजार रुपयांच्या बदल्यात एक लाख रुपयांच्या बनावट चलनी नोटा तयार करुन देत असत 

वर नमूद आरोपी पैकी श्रीकांत माने हा बनावट नोटा छापणे बाळगण्याच्या बाबतीत सराईत गुन्हेगार असून यावेळी त्याच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं.1029/2019 भा.द.वि.क.489 (अ)(क) (ड) (इ) 34 प्रमाणे गुन्हा नोंद आहे.

अटक आरोपी यांची वेळोवेळी पूर्ण 14 दिवस पोलीस कोठडी रिमांड घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास करण्यात आला. सध्या आरोपींना न्यायालयाने कोठडीत असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.

सदर कामगिरी मा.पोलीस आयुक्त श्री.कृष्ण प्रकाश ,मा अप्पर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे,पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ.काकासाहेब डोळे,सहा. पोलीस आयुक्त गुन्हे 1/2 डॉ. प्रशांत अमृतकर दरोडा विरोधी पथकांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. सिद्धेश्वर कैलासे,पोलीस उपनिरीक्षक श्री.मंगेश भांगे तसेच पोलीस अमलदार उमेश पुलगम, गणेश शिंगे,समीर रासकर, विनोद वीर,गणेश सावंत,सुनील देवकर,अमर कदम,प्रवीण कांबळे,महेश खांडे,राजेंद्र शिंदे,राहुल खारगे,विक्रांत गायकवाड,नितीन लोखंडे,आशिष बनकर, सागर शेंडगे,प्रवीण माने,राजेश कौशल्ये,चिंतामण सुपे,औदुंबर रंगे व गणेश कोकणे यांचे पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.