विहामांडवा मध्ये पटावरचा खिल्लारी बैल जंगी स्वागत

0 झुंजार झेप न्युज

विहामांडवा मध्ये पटावरचा खिल्लारी बैल जंगी स्वागत 

विहामांडवा,प्रतिनिधी किशोर धायकर: पैठण तालुक्यातील विहामांडवा या ठिकाणी पैलवान अल्ताफ सय्यद पठाण यांनी पठावरचा खिल्लारी बैल रेससाठी विहामांडवा येथे उपलब्ध करून युवकांसाठी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे,तसेच त्यांनी हा बैल मेकर इथून एक लाख एक हजार 51 रुपये देऊन आणलेला आहे, एका गरीब कुटुंबातील शेतकरी युवक असून सुद्धा माणसाला छंद असल्यावर कुठलीही गोष्ट अशक्य नसते,हे आल्ताफ आपल्याला पहावयास मिळाला आहे, अल्ताफ पठाण यांना त्यांच्या मित्रपरिवाराने सहकार्य केल्यामुळे त्यांना हा पटावरचा बैल आणण्यास खूप मोठी ऊर्जा मिळाली,

अल्ताफ सय्यद पठाण यांनी व गावातील युवकांनी पुढाकार घेऊन बाजारपेठेतून रेससाठी आणलेला खिल्लारी बैल वाजत गाजत जंगी स्वागत करत घरी आणला, यानिमित्त त्यांना पत्रकार समाजसेवक नितीन ब्रह्मराक्षस,पञकार शबीरभाई शेख, पत्रकार किशोर धायकर,युवा नेते तोफिक शेख,जावेद शेख,निलेश(दादा) धायकर ,पै.नवनाथ गायकवाड ,विष्णु बाबर,पै योगेश बाबर, आदी मिञानी आल्ताफ पठाण यांना शुभेच्छा दिल्या .

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.