गोडाऊनची भिंत तोडून 50 गॅस सिलेंडर चोरीला | झुंजार झेप न्यूज

0 झुंजार झेप न्युज

गॅस सिलेंडरच्या गोडाऊनची भिंत तोडून अज्ञात चोरट्यांनी 50 गॅस सिलेंडर चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 6) सकाळी साडेआठच्या सुमारास खामशेत येथील कल्पतरू एच पी गॅसच्या गोडाऊनमध्ये उघडकीस आली.
बिपीन सुकनराज बाफना (वय 42, र. गणपती चौक, कामशेत, ता. मावळ) यांनी याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाफना यांचे खामशेत येथे कल्पतरू एच पी गॅसचे गोडाऊन आहे. रविवारी रात्री आठच्या सुमारास त्यांनी गोडाऊन कुलूप लावून बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनची भिंत पाडून लोखंडी जाळी वाकवून आतमध्ये प्रवेश केला. गोडाऊनमधून घरगुती वापराचे 40 आणि कमर्शियल वापराचे 10 भरलेले सिलेंडर असा एकूण 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सोमवारी सकाळी गोडाऊन उघडण्याच्या वेळी हा प्रकार उघडकीस आला. कामशेत पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.