चिंचवड, भोसरी मधून दोन मोटारसायकल चोरीला

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :
चिंचवड आणि भोसरी परिसरातून घराच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी सोमवारी (दि. 6) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्तात्रय सोपान दळवी (वय 31, रा. बळवंत कॉलनी, चिंचवडगाव) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 4) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास दळवी यांनी त्यांची 25 हजार रुपये किमतीची मोटारसायकल (एम एच 42 / ए सी 5785) त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. अज्ञात चोरट्याने बनावट चावीच्या सहाय्याने मोटारसायकल चोरून नेली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.
दुस-या प्रकरणामध्ये मल्लिकार्जुन करबस इटले (वय 21, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इटले यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची मोटारसायकल (एम एच 24 / ए ई 6099) घरासमोर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा मोटारसायकलचे लॉक तोडून चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.