दुष्काळी परिस्थितीत चारा उत्पादनास चालना; पशुपालकांना वैरण बियाण्यांचे वाटप

0 झुंजार झेप न्युज

 दुष्काळी परिस्थितीत चारा उत्पादनास चालना; पशुपालकांना वैरण बियाण्यांचे वाटप

नांदेड, दि. 24 : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2026–2027 अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या चारा उत्पादन योजनेच्या माध्यमातून पशुपालकांना प्रातिनिधिक स्वरूपात वैरण बियाण्यांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमास जिल्हा नियोजन अधिकारी, नांदेड, जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय तसेच पशुधन विकास अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी पुरेशा चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी चारा उत्पादनाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच पशुपालकांनी मुरघास (सायलेज) निर्मिती व वापराला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.
याशिवाय मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना अंतर्गत उपलब्ध सुविधांचा लाभ घेऊन जास्तीत जास्त पशुपालक शेतकऱ्यांनी पशुपालन व्यवसाय अधिक सक्षम व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमात उपस्थित पशुपालकांना चारा उत्पादन व पशुधन व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.