कोल्हापुरात महिलांनी खासदारांसमोरच घेतल्या नदीत उड्या

0 झुंजार झेप न्युज

कोल्हापूर प्रतिनिधी :
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांनी मायक्रो फायनान्स कंपनीकडून घेतलेले कर्ज माफ व्हावे, या मागणीसाठी महिलांनी गांधीनगरजवळ असलेल्या पंचगंगा नदीच्या तीरावर जल आंदोलन पुकारले आहे. या आंदोलक महिलांची भेट घेण्यासाठी खासदार धैर्यशील माने गेले असता त्यांच्यासमोरच काही आंदोलक महिलांनी पाण्यात उड्या मारल्याची घटना शुक्रवारी घडली.
गेल्या दिन दिवसांपासून या महिला पंचगंगा नदीच्या तीरावर जल आंदोलन करत आहे. आज या आंदोलक महिलांचे निवेदन स्वीकारण्यासाठी खासदार धैर्यशील माने आंदोलनस्थळी आले होते. त्यावेळी काही महिलांनी थेट नदीत उड्या घेत आंदोलन केले. त्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. छत्रपती शासन संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, कोल्हापूरात ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. मात्र, या पुराच्या फटक्यातून अद्याप नागरिक सावरले नाहीत. तसेच, कर्ज घेणाऱ्या हजारो महिला अस्वस्थ आहेत. त्यातच मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्ज वसुली सुरू आहे. त्यामुळे महापुरात सर्व वाहून गेले असून अद्याप सरकारी मदत मिळाली नाही, असे असताना मायक्रो फायनान्स कंपनीचे कर्ज फेडायचे कोठून, असा सवाल करत या महिलांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. तसेच, मायक्रो फायनान्स कंपनीकडून घेतलेले कर्ज व्हावे, अशी मागणी या आंदोलक महिलांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.