भोपाळची घाण महाराष्ट्रात येणार नाही, संजय राऊतांनी ठणकावलं

0 झुंजार झेप न्युज

 "वीर सावरकर आमच्यासाठी महान होते,आहेत आणि राहतील. त्यांच्यावरची आमची श्रद्धा अशा प्रकारच्या फालतू पुस्तकाने कमी होणार नाही", असं संजय राऊत म्हणाले. अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. भोपाळमध्ये काँग्रेस सेवा दलामार्फत छापण्यात आलेल्या पुस्तिकेमुळे खळबळ उडाली आहे. या पुस्तकात स्वा. सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करण्यात आले आहे.
याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, भोपाळची घाण महाराष्ट्रात येणार नाही. ते पुस्तक अनधिकृत आहे त्यावर बंदी आहे. तरीही अशी पुस्तके वाटली जातात, भाजपच्या नेत्यांविषयीही वाटली गेली आहे. सावकरांविषयी कोणीही आम्हाला कुणी ज्ञान देण्याची गरज नाही. सावरकर देशाला प्रिय आहेत आणि यापुढेही राहतील, अशा शब्दात संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.
तसेच जे लोक सावरकरांवर आक्षेप घेणाऱ्या लोकांच डोकं तपासले पाहिजे. सतत वीर सावरकर यांच्याबद्दल आरोप करणे ही त्यांच्या मेंदूतील घाण आहे मग ते कोणीही असोत. वीर सावरकर हे आमच्यासाठी महान होते आणि राहतील, असं राऊत यांनी सांगितलं.

Sanjay Raut,Shiv Sena on a statement in Congress Seva Dal booklet 'Godse&Savarkar had a physical relationship': Veer Savarkar was a great man and will remain a great man. A section keeps talking against him,it shows the dirt in their mind,whoever they might be
View image on Twitter
637 people are talking about this

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.