Bhosari : घरफोडी करून पाऊण लाखाचा ऐवज लंपास

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : 
घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी 71 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि कागदपत्रे चोरून नेली. ही घटना कासारवाडी येथे मंगळवार (दि. 31) ते गुरुवार (दि. 2) दरम्यान घडली.
प्रसुनप्रिया कौशल किशोरलाल दास (वय 32, रा. कासारवाडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दास यांचे घर मंगळवारी (दि. 31) दुपारी साडेपाच ते गुरुवारी (दि. 2) सकाळी दहा या कालावधीत कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट कशाच्या तरी साह्याने उचकटून 25 ग्रॅम सोन्याचे व 10 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने रोख रक्कम असा 71 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.