रमेश ब्रम्हा संपादक झुंजार झेप
मो. 9146400308
लॉकडाऊन-अनलॉक दरम्यान मध्य रेल्वेकडून 61,978 टन पार्सलची वाहतूक.
1 जूनपासून काही विशेष प्रवासी गाड्यांच्या परिचालनास सुरुवात झाल्यानंतर मध्य रेल्वेने 10 सप्टेंबरपर्यंत या विशेष गाड्यांमधून 19,290 टन पार्सल रवाना केले.
रेल्वे मंत्रालयाने 7 ऑगस्टपासून मध्य रेल्वेवर भारतातील सर्वात पहिली किसान रेल्वेगाडी देवळाली आणि बिहारमधील दानापूर दरम्यान सुरु केली. या भागातील शेतकर्यांना त्यांची शेती उत्पादनं देशातील लांब अंतराच्या भागात जलद आणि आर्थिकदृष्ट्या सोयीने पाठविण्यास मदत करण्यासाठी साप्ताहिक ट्रेन म्हणून सुरु केली होती.
या उपक्रमाला शेतकर्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळेृ गाडीचा प्रवास पुढे मुझफ्फरपूरपर्यंत वाढवण्यात आला आणि सांगोला/पुणे येथून मनमाड येथे किसान लिंक रेल्वे जोडली गेली. किसान रेल्वे 8 सप्टेंबरपासून त्रि-साप्ताहिक म्हणून धावत आहे. आतापर्यंत किसान रेल्वेने 10 फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. ज्यामध्ये डाळिंब, ढोबळी मिरची, हिरवी मिरची, आलं, लिंबू आणि बर्फ-मासे इत्यादी 2,200 टनाहून अधिक नाशवंत वस्तूंची वाहतूक केली आहे.
या कोव्हिड-19 साथीच्या आजारा दरम्यान मध्य रेल्वेने एकूण 61,978 टन पार्सलची वाहतूक केली. ज्यामध्ये पार्सल एक्स्प्रेस गाड्यांद्वारा 38,618 टन, विशेष गाड्यांच्या पार्सल व्हॅनमध्ये 19,290 टन, दूध टँकरद्वारे 1,804 टन आणि किसान रेल्वेमधून 2,266 टन आदींचा समावेश आहे.
संबंधित बातम्या :
Unlock 4.0 | आजपासून राज्यात प्रवासासाठी ई-पासची अट रद्द, रेल्वेचं बुकिंग सुरु.
Indian Railway: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, 12 सप्टेंबरपासून 80 स्पेशल ट्रेन सुरु होणार.
Follow us in-
Instagram-@zunjarzep
Twittr-@zunjarzep
Fecebook-@zunjarzep

