यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे नवीन बालरोग वॉर्डचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन.

0 झुंजार झेप न्युज

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे नवीन बालरोग वॉर्डचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन.

पिंपरी चिंचवड, दि.3 ऑगस्ट : लहान मुलामुलींना झालेल्या आजाराबाबत त्यांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी अतिशय कल्पकतेने नवीन बालरोग वॉर्ड तयार करण्यात आला असून त्याचा उपयोग लहान मुलामुलींसाठी भिंतीवरील पंचतंत्र गोष्टी व कार्टुनच्या सहाय्याने त्यांच्या आजाराची तीव्रता कमी होण्यासाठी निश्चितच होईल असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे नवीन बालरोग वॉर्ड तयार करण्यात आला आहे त्याचे उद्घाटन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. 

यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी महापौर योगेश बहल, नगरसदस्या सुजाता पालांडे, सुलक्षणा धर, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, बालरोग विभागप्रमुख डॉ. दिपाली अंबिके, डॉ. संध्या हरिभक्त, डॉ. राजेश कुलकर्णी, डॉ. सीमा सोनी, डॉ. सुर्यकांत मुंडलोड आदी उपस्थित होते.

आयुक्त राजेश पाटील यांच्या संकल्पनेतून बालरोग वॉर्ड तयार करण्यात आला असून त्याचा उपयोग कोरोना प्रतिबंधासाठी होणार आहे अशी माहिती यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली.    

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.