जळगाव जिल्हा राष्ट्रीय किसान मोर्चा व राष्ट्रीय पिछडा (OBC) मोर्चाने निवासी जिल्हाधिकारी जळगाव यांना दिले निवेदन

0 झुंजार झेप न्युज

जळगाव जिल्हा राष्ट्रीय किसान मोर्चा व राष्ट्रीय पिछडा (OBC) मोर्चाने निवासी जिल्हाधिकारी जळगाव यांना दिले निवेदन

1.ओबीसींची जाती आधारित जनगणना करण्याकरिता

2. तीन काळे कृषी कायदे वापस घेण्याकरिता* 

3. ईव्हीएम मशीन सोबत जोडलेल्या पेपर ट्रेल मशीन मधून निघणाऱ्या पेपर चे शंभर टक्के मोजणी करण्यात यावी किंवा बॅलेट पेपर द्वारे निवडणुका घेण्यात याव्यात*

ओबीसी बहुजन समाजाच्या व शेतक-यांच्या हितासाठी राष्ट्रीय किसान मोर्चा व राष्ट्रीय पिछडा मोर्चा च्या वतीने संपुर्ण भारतात पाच टप्प्यातील आंदोलन घोषित करण्यात आले आहे.

यापैकी आज पहिल्या टप्प्याअंतर्गत जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन देण्यात आले.

 राष्ट्रीय किसान मोर्चा

या प्रमुख मागण्यांसाठी आज जळगाव निवासी जिल्हाधिकारी जळगाव यांना राष्ट्रीय किसान मोर्चा तर्फे मा.चंद्रकांतदादा जगदाळे (राज्याध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा),मा.विश्वासराव पाटील (जळगाव जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा, मा.रमेश बोढरे पाटील(अमळनेर तालुकाध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा),मा.सुनिलदादा शिंदे(राष्ट्रीय किसान मोर्चा पाचोरा),मा. धनराजआण्णा मोतीराये(जळगाव तालुका अध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा)आदिंनी निवेदन देण्यात आले.*

राष्ट्रीय पिछडा(OBC) मोर्चा

राष्ट्रीय पिछडा (OBC) मोर्चाच्या मागण्यांचे निवेदन मा.विलासराव पाटील (महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी मोर्चा), मा.राजेंद्र आबा माळी(महाराष्ट्र राज्य सदस्य राष्ट्रीय ओबीसी मोर्चा),सुधाकर बडगुजर(खान्देश प्रभारी राष्ट्रीय ओबीसी मोर्चा),मा.भरतराव जगताप,मा.प्रमिलाताई जगताप,मा.हर्षदाताई जगताप यांनी निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

यावेळी मा.जी.आर.चौधरी(महाराष्ट्र राज्य सदस्य राष्ट्रीय ओबीसी मोर्चा), सुमित्र अहिरे (खान्देश प्रभारी बामसेफ),राजेंद्र खरे (जिल्हा संयोजक बहुजन क्रांती मोर्चा),मा.हारुन मंसुरी(जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय असंघटित कामगार क्षेत्र),मधुकर टोंगळे सो.,प्रा.विकास उंबरकर सर, सुनिल पाटील सो.(छत्रपती क्रांती सेना),मा.शामकांत पाटील सो., सुजित टेमकर सो.,जे.डी.ठाकरे सो.,राजु भाऊ जाधव,आदि उपस्थित होते.*

   दुस-या टप्प्यातील आंदोलन

महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये २९ ऑक्टोबर २०२१ रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनाची रणनिती ठरणविण्यासाठी मा.चंद्रकांतदादा जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग संपन्न झाली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.