पाचोड येथिल धर्मशाळा रुग्णाच्या नातेवाइकांसाठी खुली करा -अनिताताई वानखेडे

0 झुंजार झेप न्युज

पाचोड येथिल धर्मशाळा रुग्णाच्या नातेवाइकांसाठी खुली करा   -अनिताताई वानखेडे

विहामांडवा,(किशोर धायकर पैठण प्रतिनिधी : पाचोड येथील शासकिय रुग्णालय जवळ असलेली धर्मशाला तत्काल रुगनाच्या नातेवाईकाना खुली करुण द्यावी, अशी मागणी पैठण तालुक्याचे राष्ट्रवादी महिला ता.अध्यक्ष अनिताताई वानखेडे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत बाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोड येथील शासकीय रुग्णालयाची धर्मशाला गेल्या कित्तेक वर्षापासून बंद आहे.

शासनाने सदरील धर्मशाला रुग्णालयातील रुगनांच्या नातेवाईक साठी बनवलेली असून ती भंगार मालाचे गोडाउन म्हणून वापरले जाते.

प्रसार माध्यमानी या विषयी अनेकदा प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिले आहे.परंतु स्थानिक प्रशासन या कड़े दुर्लक्ष करीत असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांचे हाल होत आहे.त्यांना रस्तयावर राहण्याची वेळ आलेली आहे.

सदारील धर्मशाला ही संबधित खात्याच्या अधिकारी वर्गाकड़ून वैयक्तिक किंवा भाड़े तत्वावर दुसरयाला दिल्याची शक्यता नकारता येत नाही.

तरी में. साहेबांनी या प्रकरणी गंभीर दखल घेवून उच्च स्तरीय चौकशी करुण संबंधित अधिकारी वर्गावर योग्य ती कार्यवाही करुण धर्मशाला सामान्य जनतेला खुले करुण द्यावी, व गोरगरीबांचे होणारे हाल थांबवावे अशी मागणी पैठण तालुक्याच्या राष्ट्रवादीच्या धडाडीचे कार्यकर्ते अनिता ताई वानखेडे यांनी लेखी निवेदनाद्वारे तहसीलदार यांना दिले आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.