जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन
अमरावती,दि.19: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.अधीक्षक निलेश खटके यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

