• दुचाकीच्या डोकीमधुन तब्बल ११,५०,०००/- रोख रक्कम चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात यश.
पिंपरी चिंचवड,दि.14: फियांदी यांचेवर पाळत ठेवुन त्यांचे दुचाकीच्या डीकीमधून रोख रक्कम रु ११,५०,०००/-रु सफाईदार पणे चोरी करून नेल्याची घटना दिनांक ०२/०२/२०२४ रोजी खडक पोलीस स्टेशन हददीमधील टिंबर मार्केट परिसरात पडली होती.सदर बाचन अधिक माहिती अशी की, फिर्यादी महेश शिवाजी नाळे, वय ३४ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. फ्लैट में सी ९, फेज-२, निर्मल टाऊनशिप, काळेपडळ, हडपसर, पुणे हे दि.०२/०२/२०१४ रोजी दुपारी ०१.१५ वा ते ०१.४० वा. चे सुमारास मुकेश पलाप, टिंबर मार्केट भवानी पेठ, पुणे येथे फिर्यादी यांच्यापर पाळत ठेवून, त्यांचे नकळत मुकेश प्लाप, टिंचर मार्केट भवानी पेठ, पुणे इमारतीचे पाकींगमध्ये पार्क केलेले फिर्यादी यांचे गाडीचे डिकीतील रोख ११,५०,०००/- रु त्यांचे संमतीशिवाय मुद्दाम लबाडीचे इरादधाने चोरुन नेलेबाचन अज्ञात चोरटयाविरोधात खडक पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रमांक ४३/२०२४ भा.दं.सं. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
टिंबर मार्केट सारख्या व्यापारीक्षेत्रामध्ये भर दिवसा ११,५०,०००/-रु चोरी केल्याचा प्रकार पडल्याने त्याचा तपास करुन आरोपींचा शोध घेण्यासाठी श्री. रविंद्र गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, खडक पोलीस स्टेशन पुणे, श्री. संपतराव राउत, पोलीस निरिक्षक गुन्हे, यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ तपास पथक अधिकारी सहायक पोलीस निरिक्षक श्री. राकेश जाधव व तपास पथकातील अंमलदार यांना तपासाचायत सुचना दिल्या, त्याप्रमाणे सहायक पोलीस निरिक्षक श्री. राकेश जाधव यांनी तपास पथकातील अंमलदार यांची दोन पथके तयार करुन तात्काळ तपास सुरु केला. तपास पथकातील पोलीस अंमलदार फिरणा उबरे, संदीप तळेकर, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे, सागर कुडले, प्रशांत बड़दे यांची दोन पथके तयार केली. प्रथमदर्शनी अज्ञात आरोपीने चोरी करण्यासाठी मोटारसायकलचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने एका पथकाने चोरीची घटना पडल्यानंतरचा मार्ग व एका पथकाने चोरीच्या घटनास्थळी येण्याचा मार्ग असे दोन्ही मार्गाचे सी.सी.टि.व्ही.फुटेज पाहण्यास सुरुवात केली, सलग आठ दिवस दोन्ही मागांचे सी.सी.टि.व्ही. फुटेज तपासल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजचे आधारे पाहीजे आरोपीचा माग घेत असताना सदर पाहीजे आरोपी हा बोपखेल फाटा बंधे अंगात काळया रंगाचे जैकेट व निळया रंगाचे जिन पैन्ट परीधान करून थांबला असल्याबाबत खात्रीशीर माहीती मिळाली. त्याअनुषंगाने बोपखेल फाटा पाठिकाणी वरील वर्णनाचा इसम तेथे संशयित रित्या वावरताना मिळून आला असता पथकाने त्यास तो पळून जाणार नाही अशा रितीने सापळा रचुन त्यास ताब्यात घेतले व त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नाय रामकेवल राजकुमार सरोज, वय-४६ वर्षे, सध्या रा-ज्ञानदा सोसायटी शिक्रापुर रोड चाकण पुणे, मुळ रा.१७२ पौधीपुर, कधईपुर, सुलतानपुर, लंभुआ, राज्य-उत्तरप्रदेश असे सांगितले. त्याचेकडे गुन्हयाबाचत अधिक विचारणा केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेवून दाखल गुन्हयात दिनाक १०/०२/२०१४ रोजी २२.३५ वा अटक करण्यात आले,अटक आरोपीकडे गुन्हयात चोरी केलेल्या ११,५०,०००/- रु रोख रकमेचाजत चौकशी केली असता अटक जारोपीने चोरी केलेल्या रोख रक्कम ही बैंक ऑफ बडोदा, अहमदनगर शाखा, जैक्सीस बैंक, चाकण शाखा या बैंकेतील न्याचे स्वतःचे खात्यावर तसेच सेन्ट्रल बैंक ऑफ इंडिया, उत्तरप्रदेश शाखेत व्याचे पत्नीचे खात्यावर जमा केल्यावाचत सांगितले. संबंधित बँकांना पत्रव्यवहार करुन वरील नमुद बैंकची खाती गोठविण्यात आली आहेत.
तसेच अटक आरोपीने चोरी करताना वापरलेल्या वाहनाचाबत तपास केला असता चोरी करताना वापरलेले होंडा शाइन एम.एच.१२ एस.एन.५८३० ही मोटारसायकल राजगड पोलीस स्टेशन मु.र.नं.२६/२०२५ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे मधील चोरीस गेलेले वाहन असल्याचे तपासात निश्पन्न झालेले असून सदरची मोटारसायकल ताब्यात घेतली आहे.
सदर गुन्हाचे तपासाकरीता नेमलेल्या पथकातील अंमलदार किरण ठवरे, संदीप तळेकर, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे, सागर कुडले, प्रशांत पडदे यांनी सहायक पोलीस निरिक्षक राकेश जाधव यांचे मुचनेनुसार सलग आठ दिवस घटनास्थळापासुन ते दिधी, विश्रांतवाडी परिसरातील सरकारी/खाजगी असे जवळजवळ ५०० पेक्षा अधिक सी.सी.टि.व्ही. जिददीने व चिकाटीने तपासुन चोस्टयाचा माग काढून आरोपीला साच्यात चेपुन गुन्हा उघडकीस आणला आहे. अटक आरोपी याने पापूर्वी अटक झाल्यानंतर त्याचे नाव रामकेवल राजकुमार सरोज, उर्फ राकेश प्रदीपसिंग रजपुत असे सांगितल्याची माहीती मिळाली असून त्याचेवर पुणे शहर, पिंपरी चिंचवड, मुंघई आयुक्तालयात असे एकुण चोरीचे ३० गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे. राकेश जाधव, सहायक पोलीस निरिक्षक, (तपास पथक अधिकारी) हे पुढिल तपास करीत आहेत.
नमुद सर्व कारवाई ही श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त, श्री.प्रविण पवार, सह पोलीस आयुक्त, श्री. प्रविण पाटील, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्री. संदिपसिंह गिल, पोलीस उप आयुक्त परिमंडळ । व श्रीमती रक्मीणी गलांडे, सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशन चे श्री. रविंद्र गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. संपतराव राउत, पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथक अधिकारी श्री. राकेश जाधव सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार संदिप तळेकर, किरण ठवरे, हर्षल दृढम, प्रमोद भोसले, अक्षयकुमार बाबळे, सागर कुडले, सखन बाबरे, प्रशांत बड़दे, रफिक नदाफ, आशिष चव्हाण यांचे पथकाने केली आहे.

