नांदेडमध्ये अवैध गांजा लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ११८ झाडांसह ८८ किलो गांजा जप्त!

0 झुंजार झेप न्युज

माहूर तालुक्यातील दहेगाव शिवारात कापूस व तुरीच्या पिकात लपवून केली जात होती गांजाची लागवड; NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

नांदेड,दि.22 : माहूर तालुक्यातील दहेगाव शिवारात कापूस आणि तुरीच्या पिकांमध्ये लपवून करण्यात आलेल्या अवैध गांजा लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत गांजाची तब्बल ११८ झाडे तसेच ८८ किलो २८० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

शेतीच्या पिकांच्या आड गांजाची अवैध लागवड केली जात असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत गांजाची झाडे आणि गांजा जप्त केला.

या प्रकरणी माहूर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध अंमली पदार्थांची लागवड आणि तस्करी रोखण्यासाठी पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.