१० तासांत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! अपहरण झालेल्या चार महिन्यांच्या बालिकेची सुखरूप सुटका
ठाणे,दि.16: चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्या अवघ्या चार महिन्यांच्या बालिकेची पोलिसांनी तत्परतेने आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या जोरावर अवघ्या १० तासांत सुखरूप सुटका केली. या कारवाईमुळे बालिकेच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
बालिकेच्या अपहरणाची माहिती मिळताच चितळसर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. विविध तपास पथकांच्या मदतीने शोधमोहीम राबवत पोलिसांनी अवघ्या १० तासांत बालिकेचा शोध घेतला आणि तिला सुखरूप तिच्या आईच्या स्वाधीन केले.पोलिसांच्या या तत्पर, धाडसी आणि कौतुकास्पद कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. संकटाच्या काळात पोलिसांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि कार्यतत्परता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

