चारही माजी नगरसेवकांच्या विरोधात बेमुदत उपोषण

0 झुंजार झेप न्युज

चारही माजी नगरसेवकांच्या विरोधात बेमुदत उपोषण 

पिंपरी चिंचवड,दि.05: दि ०४/१२/२०२३ (पिंपरी चिंचवड,पुणे)भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत अंकुश चौक,निगडी, पुणे येथे स्वागत कमानीस भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख तेथील काही नगरसेवकांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. कमानीस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव असुन सुद्धा ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न या चारही नगरसेवकांकडून करण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथील मा.सुरज गायकवाड (अध्यक्ष, भीमशक्ती वि. संघटना पिंपरी चिंचवड शहर),मा.प्रमोद क्षिरसागर (संस्थापक अध्यक्ष लढा युथ मूव्हमेंट),मा बुद्धभुषण अहिरे(अध्यक्ष धम्मक्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्था) यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत, अंकुश चौक निगडी पुणे येथे आजपासून बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे.......

यावेळी रमेश गायकवाड (अध्यक्ष राज रत्न बुद्ध विहार) गौतम पटेकर (अध्यक्ष नालंदा बुद्ध विहार) सनी पवार (पुणे जिल्हा अध्यक्ष कामगार संघर्ष सेना) विजय बोराडे, मंगेश धीवार, राहुल बनसोडे, आकाश कांबळे, एकनाथ कसबे, गौतम गायकवाड, लक्ष्मण साळुंके, प्रवीण वाघमारे, मनीष कविटकर, मंथन गायकवाड, अतिश नागटिळक, संदिप माने, अजय गायकवाड आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.