पिंपरी-चिंचवडमध्ये पुणे मेट्रो अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर संताप — फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी!
पिंपरी चिंचवड दिनांक 26 : भक्तीशक्ती उड्डाणपुलाखालील श्रीकृष्ण मंदिर ते अंकुश चौक हा मार्ग मागील सहा महिन्यांपासून बंद ठेवण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी पुणे मेट्रो अधिकाऱ्यांनी ना सुरक्षा रक्षक तैनात केला, ना कोणतेही दिशादर्शक फलक लावले.याच निष्काळजीपणामुळे रस्त्यावर खोदलेल्या खोल खड्ड्यात एक दुचाकीस्वार पडून गंभीर जखमी झाला. तरीही या गंभीर अपघाताकडे मेट्रो प्रकल्प अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही, असा आरोप आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी थेट पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांकडे मेट्रो अधिकार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच रस्ता तातडीने दुरुस्त करून वाहतूक सुरळीत करण्याबाबतही त्यांनी लिखित निवेदन सादर केले आहे.
➡️ स्थानिकांमध्ये तीव्र संताप… अपघातांची मालिका थांबणार कधी?

