पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विषय समितींच्या सभापतींची निवडणूक संपन्न

0 झुंजार झेप न्युज

 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विषय समितींच्या सभापतींची निवडणूक संपन्न

पिंपरीदि. २ मार्च २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध समितींच्या सभापतीपदाची निवडणूक आज पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे संपन्न झाली. यामध्ये विधी समिती सभापतीपदी सुजाता बोराटेमहिला व बालकल्याण समिती सभापतीपदी राणी पठारेशहर सुधारणा समिती सभापतीपदी संजय नाना काटेक्रीडाकलासाहित्य व सांस्कृतिक समिती सभापतीपदी कैलास कुटे आणि शिक्षण समिती सभापतीपदी रविना आंगोळकर यांची निवड झाली आहे.

महापालिकेच्या विविध विषय समितींच्या सभापती पदी निवड करण्यासाठी आज त्या त्या समितीची विशेष सभा पार पडली. या सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी तथा पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी कामकाज पाहिले.

नवनिर्वाचित सभापतींना पिठासीन अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोरविक्रांत बगाडेनगरसचिव मुकेश कोळपविशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह नगरसदस्य व नगरसदस्या उपस्थित होते. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.

तरविधी समितीच्या विशेष सभेला समितीचे सदस्य ज्ञानेश्वर जगतापकुंदा भिसेकुशाग्र कदमशेखर चिंचवडेवर्षा जगतापमहिला व बालकल्याण समितीच्या विशेष सभेला समितीचे सदस्य पल्लवी जगतापनिता पाडाळेरेश्मा भुजबळशिवानी नरळेसुप्रिया चांदगुडेनिकिता कदमसारिका मासूळकरशहर सुधारणा समितीच्या विशेष सभेला समितीचे सदस्य अर्चना सस्तेकुणाल वाव्हळकरउत्तमराव केंदळेअनंत कोऱ्हाळेक्रीडाकलासाहित्य व सांस्कृतिक समितीच्या विशेष सभेला समितीचे सदस्य शाम जगतापतानाजी बारणेधर्मपाल तंतरपाळेयोगेश लांडगेजितेंद्र ननवरे आणि शिक्षण समितीच्या विशेष सभेला समितीचे सदस्य पल्लवी वाल्हेकरकविता भोंगाळेरिटा सानपसारिका बोऱ्हाडेप्रियांका कुदळेयोगिता बारणे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.