पुण्यात तीन वर्षांपासून फरार असलेला आरोपी पोलिसांच्या ताब्यात गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई; गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध
पुणे,दि.16 : पुणे शहरातील गुन्हे शाखा युनिट १ च्या पोलीस पथकाने गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शोधून ताब्यात घेतले. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात संबंधित आरोपी फरार होता.गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस पथक फरार आरोपींचा शोध घेत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. संबंधित आरोपी मॉडेल कॉलनी परिसरातील हरिओम मठाजवळ असलेल्या सुपर मार्केटजवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून, या कारवाईमुळे फरार आरोपींविरोधातील तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे.

