भूषण भागवतराव तांबे यांची मराठवाडा अभियांत्रिकी विभागीय उपाध्यक्ष पदी निवड
विहामांडवा,किशोर धायकर पैठण प्रतिनिधी:पैठण तालुक्यातील हिरडपुडी येथील इजि.भुषण भागवत तांबे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मराठवाडा विभागीय अभियांत्रिकी च्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेश चे प्रदेशाध्यक्ष मा.ना. जयंतराव पाटील ,राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा मा. सोनिया दुलन,यांच्या मान्यतेने इंजिनिअर. भूषण भागवतराव तांबे यांची नियुक्ती करण्यात आली, आदरणीय शरदचंद्ररावजी पवार यांच्या विचारांनुसार ,मा.ना.अजितदादा पवार आणि मा.खा.सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील काळात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या माध्यमातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आपण भरीव कार्य कराल व पक्ष संघटना मजबूतीने उभी कराल अशी अपेक्षा विद्यार्थी प्रदेशअध्यक्ष सुनील गव्हाणे ,मराठवाडा अध्यक्ष प्रशांत कदम, यांनी व्यक्त केली या निवडीबद्दल तालुकाध्यक्ष कॉंग्रेस कमिटी पैठण विनोद तांबे, सरपंच भागवत जिजा तांबे , खरीदी विक्री संघाचे संतोष तांबे, नितीन ब्रम्हराक्षस, गणेश गारुळे, भैय्या तांबे, राहुल इंगावले, भिमराव मोरे, शिवाजी ढोले, आफसरभाई शेख, नसीरभाई शेख, चाँद पटेल,दिपक इंगावले,चंद्रकांत घायतडक, फिरोजभाई, गणेश मोरे,पंकज हातागळे, सोमनाथ मोरे, आदींनी अभिनंदन केले.
