तेवीसाव्या वर्षी शेतकर्‍याच्या लेकीचे घवघवीत यश; आरती गवारे राज्यात दुसर्‍या क्रमांकाने 'एलआयसी विकास अधिकारी’

0 झुंजार झेप न्युज

निगडी येथील ओझर्डे'ज रॅडिकल इंस्टीट्यूटचे प्रा.भूषण ओझर्डे यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन

पिंपरी चिंचवड,दि.29: काही जण सर्व काही अनुकूल असतानाही उगाच तक्रारींचा पाढा वाचतात. मात्र काही जण परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी तिचा कोणताही बागुलबुवा न करता सर्व अडचणींवर मात करतात. खेड तालुक्यातील मोई येथील शेतकरी कुटुंबातील आरती गवारे नं परिस्थितीबद्दल कोणतीही तक्रार न करता तळवडे येथील आयटी कंपनी मध्ये नाईट शिफ्ट मध्ये नोकरी करत आपल्या मेहनतीच्या जोरावर एलआयसी विकास अधिकारी परीक्षेत मुलींमध्ये महाराष्ट्रात दूसरी येत घवघवीत यश संपादन केलंआहे. तेवीसाव्या वर्षी लेकीनं मिळवलेल्या नेत्रदीपक यशाने वडिल संतोष गवारे आणि आई उषा गवारे यांना आकाश ठेंगणं झालं आहे.

तिने फक्त परीक्षाच पास केली नाही तर राज्यात ‘एलआयसी विकास अधिकारी’ म्हणून नववा क्रमांक पटकवला आहे. आरतीचं हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. एलआयसीमार्फत एलआयसी विकास अधिकारी पदासाठी घेण्यात आलेल्या 2023 च्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात आरतीने राज्यात नववा क्रमांक तर मुलींमध्ये महाराष्ट्रात दूसरा क्र्मंका पटकावला आहे. 2023 साली आरतीने ही परीक्षा दिली होती. आरतीच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

खेड तालुक्यातील मोई हे आरतीचं गाव. तालुक्याच्या शिवाजी विद्यालयात नेहा शिक्षण घ्यायची. अकरावी-बारावीचे शिक्षण निगडी येथील कॅम्प एज्युकेशन येथून झाले. तर बीकॉम तीने मॉडर्न कॉलेज मधून केले. गावामध्ये येण्याजाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसल्यामुळे ती पिंपरी चिंचवड मध्ये मामा कडे राहत शिक्षण घेत होती. घरची परस्थिती प्रतिकूल होती. मात्र परिस्थितीवर मात करत नेहानं घवघवीत यश मिळवलं. शासकीय आधिकारी होण्याचं स्वप्न आरती नं उराशी बाळगलं होते. आरतीचे वडिल अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांच्याकडे दोन एकर शेती आहे. त्यामुळे नेहाचे वडिल इतर ठिकाणी काम करायचे. आरती आईला घरकामात मदत करत लहानपानापासून अभ्यास करायची. घरची परिस्थिती हलाखीची होती. मात्र लेकीने शिकावं, असं नेहाच्या घरच्यांना वाटायचं. आई-वडिलांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करत आरतीनं देदीप्यमान यश मिळवलं आहे.

माझ्या आई वडिलांचं मी अधिकारी व्हावं असं स्वप्न होतं. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी कसलिही अडचण येऊ दिली नाही. त्याचबरोबर अनेक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास अत्यंत सोप्या पध्दतीने करण्यासाठी निगडी येथील ओझर्डे'ज रॅडिकल इंस्टीट्यूटचे प्रा.भूषण ओझर्डे यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचं आरती गवारे हिनं सांगितलं.

संतोष गवारे यांनी मुलीच्या यशाबद्दल बोलताना तिचं कौतुक केलं. तिला हे मिळालेल यश ही आनंदाची गोष्ट आहे. मुला मुलींना शिक्षण देणं हे आमचं कर्तव्य आहे. आरती आता तळवडे येथे आयटी कंपनी मध्ये नोकरी करत असून सुट्टीच्या दिवशी गावी येऊन घरच्या कामात मदत करते, असं संतोष गवारे म्हणाले.. ‘लेकरं शिकली, तर सगळं सार्थक होईल,’ या एकाच वाक्यातून संतोष गवारे यांची मुलांच्या शिक्षणांबद्दल आस्था लक्षात येते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.