श्रीरेणुका देवी शरद कारखान्याच्या चेअरमन पदी विलास भुमरे तर वाय चेअरमनपदी नंदू पठाडे यांची निवड.

0 झुंजार झेप न्युज

श्रीरेणुका देवी शरद कारखान्याच्या चेअरमन पदी विलास भुमरे तर वाय चेअरमनपदी नंदू पठाडे यांची निवड.

विहामांडवा,दि.04,(किशोर धायकर.पैठण प्रतिनीधी) : श्री रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच पार पडलेल्या 14 जागा बिनविरोध जिंकत सात जागेसाठी झालेल्या निवडणुकीत रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या नेतृत्वाखाली शिवशाही शेतकरी व कारखाना विकास पॅनलने महाविकास आघाडीच्या श्री रेणुका देवी शेतकरी कारखाना बचाव पॅनलच्या धुवा उडवत एकहाती सत्ता मिळवली. आज दिनांक चार जुलै रोजी कारखान्याच्या वतीने विशेष सभा बोलून चेअरमन व व्हा चेअरमन पदाची निवडणूक पार पडली यामध्ये चेअरमन पदी विलास भुमरे यांची बिनविरोध तर व्हा चेअरमन पदी नंदू पठाडे यांची बिनविरोध निवड पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुकेश बारहाते, व सहाय्यक म्हणून विष्णू रोडगे हे होते.

विहामांडवा पासून जवळ असलेल्या श्री रेणुकादेवी शरद कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्र लक्षात घेता १७ वर्ष बंद असलेला कारखाना मंत्री संदिपान भुमरे यांनी २०१७ साली कारखान्याची संस्थापक चेअरमन चंद्रकांत घोडके यांच्या विरुद्ध निवडणूक लढवून कारखान्यावर सत्ता मिळवली. त्यानंतर सर्व हंगाम यशस्वीरित्या पार पाडली त्यामुळे २०२३ च्या निवडणुकीत मंत्री भुमरे यांना एकहाती सत्ता मिळाली. यावेळेस चेअरमन पदाची जबाबदारी त्यांचे पुत्र विलास भुमरे यांना देण्यात आली. 

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश पवार मार्केट कमिटीचे चेअरमन राजू नाना भुमरे कारखान्याचे संचालक नितीन तांबे,भरत तवार,सुभाष चावरे, सुभाष गोजरे,अफसर शेख, दिलीप बोडखे,अक्षय डुकरे, अमोल थोरे,चंद्रकांत गवांदे लक्ष्मण डांगे,विष्णू नवथर, भीमराव वाकडे,ब्रह्मदेव नरके, कल्याण धायकर,पुष्पाबाई लांडगे,भागीरथीबाई गाभूड, द्वारकाबाई काकडे,ज्ञानदेव बढे, हे उपस्थित होते.यावेळी नंदलाल काळे,बाबुराव पडुळे,श्री रेणुकादेवी शरद मिलचे दत्तात्रय रेवडकर कार्यकारी संचालक नामदेव बावडकर, श्रीमंत टेकाळे उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.