दिशा समिती बैठक; विविध विषयाचा घेतला आढावा

0 झुंजार झेप न्युज

दिशा समिती बैठक; विविध विषयाचा घेतला आढावा

अकोला,दि.04: जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना व कार्यक्रमांचा सद्यस्थितीचा आढावा आमदार रणधीर सावरकर यांनी घेतला. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील सांडपाणी व घनकचाराचे व्यवस्थापन करा. तसेच घनकचरा व गोबरपासून विजनिर्मिती प्रकल्पाचे कामे प्राधान्याने मार्गी लावा, असेही निर्देश त्यांनी आढावा बैठकीत दिले.

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीची बैठक आज जिल्हा नियोजन भवनाच्या छत्रपती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी आ. रणधीर सावरकर हे होते. जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती संगिताताई अढाऊ, विधानसभा सदस्य आ. प्रकाश भारसाकळे, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, तसेच सर्व विभागप्रमुख, समिती सदस्य आदी उपस्थित होते.

प्रारंभी प्रधानमंत्री आवास योजनेतून बांधकामास मंजूरी दिलेल्या १ हजाराहून अधिक घरकुलांच्या कामाचे ऑनलाईन भुमिपूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामिण भागात लोकांना शेतापर्यंत जाण्यासाठी रस्त्यांची सोय नसणे ही गंभीर समस्या आहे. शेतकऱ्यांना शेतात पोहोचता यावे, शेतातील उत्पन्न बाहेर आणणे सोपे जावे यासाठी पाणंद रस्ते तयार करण्याचे काम प्राध्यानाने करावे. तसेच स्वच्छ भारत मिशनअंतर्गत सर्व नगर परिषद रिसायकलीचे काम 31 जुलैपर्यंत पुर्ण करा, असे निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी दिले.   

आढावा बैठकीत राष्ट्रीय भूमी अभिलेख विभागाकडून भूमी अभिलेखा आधुनिकरण कार्यक्रमाअंतर्गत १०० टक्के अभिलेख्यांचे स्कॅनिंग करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगर हमी योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम, स्वच्छ भारत मिशन शहरी व ग्रामिण, राष्ट्रीय ग्रामिण पेयजल कार्यक्रम, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’, पंडीत दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, एकात्मिक शक्ती विकास योजना, पंडीत दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, मध्यान्न भोजन योजना, अशा विविध योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.