अवैधरित्या गुटखा वाहतुक करणारे इसमांवर धडक कारवाई
ठाणे,दि.09: विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने निवडणुक आयोगाने दिलेल्या सुचना प्रमाणे अंमलीपदार्थांची शोध मोहिम राबविण्या संदर्भात मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर, श्री. आशुतोष डुंबरे यांनी दिलेल्या सुचना व आदेशाप्रमाणे कारवाई करीत असताना, भोईवाडा पोलीस स्टेशनचे पथक हद्दीत प्रभावीपणे गस्त करत असताना दिनांक ०७/११/२०२४ रोजी सकाळी ०६:०० वा. चे सुमारास गोपनिय बातमीदारा कडून माहिती मिळाली की, जामा मस्जिद, सोमा नगर येथे अवैधरित्या गुटखा भरलेल्या दोन पिकअप उभ्या आहेत अशा आशयाची बातमी मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाले व पथकांनी सदर ठिकाणी जावुन बातमीची खात्री केली असता, जामा मस्जिद, सोमा नगर येथे एक महिंद्रा कंपनीचा पॅक बॉडीचा पिकअप नं. एम एच ४८ सीबी ३४५८ व टाटा अल्ट्रा पिकअप गाडी नंबर एम एच ४८ सीक्यु ७६४२ या रोडवर उभ्या होत्या व सदर दोन्ही पिकअप गाडयाची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यात ३१,१८,५००/- रूपये किंमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा असा अन्न पदार्थ गोणीमध्ये मिळुन आला. पोलीसांनी सदर गुटखा व एकुण १२,००,०००/- रूपये किंमतीच्या दोन्ही गाडया जप्त केल्या असुन त्याबाबत भोईवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ भिवंडी, डॉ मोहन दहिकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, पश्चिम विभाग भिवंडी, श्री. दिपक देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक रत्नपारखी यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. संदिप रासकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाले तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक विनोद शेंडकर, पो. हवा/रावत, पो. हवा / सोनगिरे, पोना/नांगरे, पोना/धायगुडे, पोशि/पालवी, पोशि/पवार, पोशि चव्हाण, पोशि/घुगे, पोशि/बसवंत, पोशि/देवरे, यांनी केलेली असुन सदर गुन्हयाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाले हे करीत आहेत.

