प्रतिकारशक्ती वाढवी लसीकरण
छत्रपती संभाजीनगर,दि.09: दरवर्षी दि.१० नोव्हेंबर रोजी जागतिक लसीकरण दिवस साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश लोकांमध्ये लसीकरणाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि प्रत्येक वयात आवश्यक लसीकरण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे, नियमीत लसीकरणाने बालमुत्युचे व आजाराचे प्रमाण कमी करणे हा आहे, बालकांचे योग्य वयात संपूर्ण लसीकरण पुर्ण करणे हा आहे.
लसीकरणाबद्दल काही महत्त्वाची गोष्टी:
• लसींत सबळ जंतू नसतात, त्यामुळे रोग होत नाही.
• लसीमुळे शरीरात रोगजंतूंशी लढण्याची क्षमता निर्माण होते.
• लसीकरणामुळे प्रतिकारशक्ती वाढते.
• एकेकाळी जीवघेणा ठरणाऱ्या रोगांना लसीमुळे आळा बसला आहे.
लसीकरण म्हणजे काय आणि ते का आवश्यक आहे? - जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, लसीकरणामुळे दरवर्षी २ ते ३ दशलक्ष मृत्यू टाळले जातात. संस्थेच्या म्हणण्यानुसार, लसीकरणामुळे शरीरात आवश्यक रोगप्रतिकारशक्ती निर्माण करून रोगांची संवेदनाक्षमता रोखण्यात आणि कमी करण्यात मदत होते ज्यामुळे गंभीर गुंतागुंत होऊ शकते आणि मृत्यू देखील होऊ शकतो.
शरीरात आवश्यक प्रतिकारशक्ती निर्माण होते
गर्भधारणेदरम्यान आई आणि तिच्या गर्भाचे अनेक रोग आणि समस्यांपासून संरक्षण करण्यासाठी, टिडी , इन्फ्लूएंझा, इत्यादी लसीकरण मातेला दिले जाते. याशिवाय बालकांना टीबी, पोलिओ, रोटाव्हायरस, अतिसार, डांग्या खोकला, धनुर्वात, हिपॅटायटीस बी, गोवर, हिब-न्युमोनिया आणि मेंदुज्वर या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी बाळाचा जन्म झाल्यानंतर लगेचच ते पाच वर्षांपर्यंत पोलिओचे नियमित डोस, जन्मतः झीरो OPV, BCG, HEPB, दिड महिन्यानंतर OPV Rota, fIPV, Pentavalent, PCV, MR, व्हिटॅमिन-A, DPT आणि TD या लसी वयोगटानुसार वेगवेगळ्या प्रकारात आणि प्रमाणात दिल्या जातात. तेव्हा आवश्यक लसीकरण करून, रोग टाळण्यासाठी आणि लढण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती तयार होते.
लसीकरण कार्यक्रमांमुळे संरक्षण तयार करण्यासाठी तुमच्या शरीराच्या नैसर्गिक संरक्षणासह कार्य करून लस रोग होण्याचा धोका कमी करतात . जेव्हा तुम्हाला लस मिळते तेव्हा तुमची रोगप्रतिकारक शक्ती प्रतिसाद देते. जीवघेण्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी लसी आहेत, ज्यामुळे सर्व वयोगटातील लोकांना दीर्घ, निरोगी आयुष्य जगण्यास मदत होते. लसिकरण हे सर्व शासकीय आरोग्य संस्थेमध्ये मोफत उपलब्ध आहे. नागरिकांनी आपल्या बालकांचे नियमीत लसिकरण करुन घ्यावे,असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विशाल बेंद्रे यांनी केले आहे.

