सुट्ट्यांमुळे इच्छुकांना कमी वेळ — प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, अशी भूमिका सचिन काळभोर यांची स्पष्ट मागणी.

0 झुंजार झेप न्युज

स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज मुदतवाढीची जोरदार मागणी! 🏛️
सुट्ट्यांमुळे इच्छुकांना कमी वेळ — प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, अशी भूमिका सचिन काळभोर यांची स्पष्ट मागणी.

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे स्वीकृत नगरसेवक पदांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख दि. २ मार्च २०२६ जाहीर करण्यात आली आहे. मात्र अर्ज प्रक्रियेच्या कालावधीत शनिवार व रविवारच्या सुट्ट्या येत असल्याने इच्छुक उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे गोळा करून सादर करण्यासाठी अत्यंत कमी वेळ मिळाल्याची तक्रार समोर येत आहे.

सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, वकील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अर्ज प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. सुट्ट्यांमुळे शासकीय कार्यालये बंद असल्याने दाखले, प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत असल्याचे इच्छुकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेक पात्र उमेदवारांना अर्ज सादर करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तात्काळ दखल घेऊन अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. समाजातील सर्व घटकांना समान संधी मिळावी आणि पात्र उमेदवारांना पुरेसा वेळ मिळावा, यासाठी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनीही यासंदर्भात अधिकृतरीत्या मागणी केली असून, “सुट्ट्यांमुळे अर्ज प्रक्रियेसाठी वेळ अपुरा ठरत आहे. प्रशासनाने पारदर्शकता आणि समान संधीच्या दृष्टीने किमान काही दिवसांची मुदतवाढ द्यावी,” अशी भूमिका मांडली आहे.

आता प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.