बनावट भरती प्रक्रियेपासून सावध राहण्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आवाहन

0 झुंजार झेप न्युज

 बनावट भरती प्रक्रियेपासून सावध राहण्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आवाहन

पिंपरीदि. २५  फेब्रुवारी २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत सध्या कोणत्याही पदासाठी भरती प्रक्रिया सुरू नसल्याची स्पष्ट माहिती प्रशासन विभागाने दिली आहे. अलीकडे समाजमाध्यमांवर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असल्याचे भासवणारी खोटी व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली जात आहे. तसेच महापालिकेच्या नावाने बनावट नियुक्तीपत्रेउमेदवारांची यादी देखील प्रसिद्ध केली जात आहे. परंतु महानगरपालिकेकडून भरती प्रक्रियेबाबत अद्याप कोणतेही अधिकृत आदेश अथवा सूचना जारी करण्यात आलेल्या नाहीतअशी माहिती प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.तथापिबनावट जाहिराती व संदेशांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी प्रशासन विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नयेअसे आवाहन महापालिकेच्या प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे


भरती प्रक्रियेबाबतची सर्व अधिकृत माहिती वेळोवेळी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे इतर कोणत्याही माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊनच तिची खातरजमा करावीअसे आवाहन प्रशासन विभागाचे सहआयुक्त मनोज लोणकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.