रिक्षा चोरी करणाऱ्या चोरास कोंढवा पोलिसांकडून अटक

0 झुंजार झेप न्युज

रिक्षा चोरी करणाऱ्या चोरास कोंढवा पोलिसांकडून अटक 

पुणे,दि.25: कोंढवा पोलीस स्टेशन गु र न 731/2024 भा द वि 379 मधील आरोपींचा शोध घेणे कामी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे साहेब यांनी श्री लेखाजी शिंदे तपास पथक यांना मौखिक आदेश केले होते सदर आदेशानुसार आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अम विकास मरगळे व पोलीस अम शशांक खाडे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी नामे कासिम उर्फ तुकडा शेख रा साईबाबा नगर कोंढवा याने चोरी केली असल्याचे समजले सदर आरोपी हा गांगाधाम रोड फाशी गेट येथे येणार असल्याची माहिती मिळताच तेथे सापळा लाऊन त्याला चोरीच्या रिक्षासह ताब्यात घेतलं त्याला पोलिस स्टेशन येथे आणून त्याच्या कडे चौकशी केली असता त्याने रिक्षा चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याला सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली. सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. 

सदर कामगिरी मा. अमीतेश कुमार पोलिस आयुक्त, मा.मनोज पाटील अप्पर पोलिस आयुक्त,पूर्व प्रादेशिक विभाग, मा.ए राजा पोलिस उप आयुक्त,परिमंडळ 5, मा. गणेश इंगळे मा.सहा पोलिस आयुक्त वानवडी विभाग पुणे, मा. संतोष सोनवणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस स्टेशन, ,मा. मानसिंग पाटील साहेब पोलिस निरीक्षक गुन्हे कोंढवा यांचे मार्गदर्शना खाली श्री लेखाजी शिंदे सहा पो निरी, श्री बालाजी डिगोळे पो उपनिरी, पो हवा अमोल हिरवे, पोलिस हवा राहुल वंजारी,पो अम अभिजित रत्नपारखी, पो अम अभिजीत जाधव, पो अम सुहास मोरे, पो अम गणेश चिंचकर पो अम अक्षय शेंडगे, पो अम विकास मरगळे,पो अम राहुल रासगे, पो अम शशांक खाडे कोंढवा पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.