रयत विद्यार्थी विचार मंच च्या माध्यमातून मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत

0 झुंजार झेप न्युज

रयत विद्यार्थी विचार मंच च्या माध्यमातून मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत 

पिंपरी चिंचवड,दि.25: मावळ तालुक्यातील कचरेवाडी व करंजगाव पठार येथील जिल्हा परिषदेच्या 2 शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वह्या व इतर स्टेशनरी साठी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेकडे शाळेच्या वतीने मदत करण्याची विनंती केली होती. त्यानुसार जवळपास 7500 /- रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य शाळेकडे सुपूर्द केले. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.   

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मा. शिल्पा बडगुजर यांनी सर्वांचे स्वागत करत विद्यार्थ्यांना संस्था व सर्व पदाधिकार्यांची ओळख करून दिली. रयत विद्यार्थी विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष श्री धम्मराज साळवे यांनी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेण्याबरोबरच संस्था त्यांच्या समवेत शैक्षणिक मदतीसाठी सोबत असल्याचे आश्वासन दिले. संस्थेचे महासचिव संतोष शिंदे यांनी रयत विद्यार्थी विचार मंचाची भूमिका मांडली. राज्य संपर्क प्रमुख/ मावळ तालुका अध्यक्ष अतुल वाघमारे यांनी संस्थेची संकल्पना मांडताना विद्यार्थ्यांना देखील मोठे होऊन अशीच समाजाशी नाळ जोडण्यासाठी आवाहन केले. मावळ तालुका महासचिव प्रा. विक्रांत शेळके यांनी मुलांशी मोकळ्या भाषेत संवाद साधत मुलांना हसवून त्यांना शिक्षण, करिअर , अभ्यास, खेळ या सर्वांना समान महत्व देत आयुष्य जगण्याविषयी मार्गदर्शन केले. मावळ तालुका उपाध्यक्ष सागर गायकवाड यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.