चिखली येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्याकडून पाहणी; प्रक्रिया केलेले पाणी प्रभावी पुनर्वापरावर भर...

0 झुंजार झेप न्युज

 चिखली येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्याकडून पाहणीप्रक्रिया केलेले पाणी प्रभावी पुनर्वापरावर भर...


पिंपरी दि.२६  एप्रिल २०२६ :-  पिंपरी चिंचवडचे वाढते शहरीकरण आणि भविष्यातील सांडपाणी व्यवस्थापनाची गरज ओळखून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी चिखली येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला (STP) भेट देऊन तेथील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. चिखली परिसरातील सांडपाणी व्यवस्थापन अधिक सक्षम आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

या दौऱ्यादरम्यान सभापती अभिषेक बारणे यांनी प्रकल्पाच्या संपूर्ण कार्यप्रणालीची सविस्तर माहिती घेतली. सांडपाण्याचे शुद्धीकरण कोणत्या स्तरावर केले जाते आणि प्रक्रिया केलेल्या पाण्याचा प्रभावी पुनर्वापर कसा करता येईलयावर त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा केली. शहरातील जलप्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध तांत्रिक उपाययोजनांचा आढावा घेताना त्यांनी व्यवस्थापकांना सूचनाही केल्या. पर्यावरणाचे रक्षण करण्यासोबतच उपलब्ध पाण्याचा पुनर्वापर करून नैसर्गिक स्त्रोतांवरील ताण कमी करणेहा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून त्यांना स्वच्छसुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिकता असल्याचे अभिषेक बारणे यांनी स्पष्ट केले. शहराचा होणारा विस्तार पाहता आगामी काळात सांडपाणी व्यवस्थापनाची यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोतअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

प्रतिक्रिया....

भविष्यातील गरजा लक्षात घेऊन चिखली येथील प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यावर आणि पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प राबविण्यावर  विशेष भर दिला जाणार आहे.

-अभिषेक बारणेस्थायी समिती सभापतीपिंपरी चिंचवड महापालिका.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.