जनगणनेतील प्रत्येक टप्पा अचूक आणि सुलभ पद्धतीने पार पाडा - अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम

0 झुंजार झेप न्युज

जनगणनेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणकपर्यवेक्षक आणि फील्ड ट्रेनर्स यांना केले मार्गदर्शन



पिंपरी : दि. 26 एप्रिल २०२६: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जनगणना मोहिमेअंतर्गत प्रशिक्षण प्रक्रियेला गती मिळाली असून अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी आकुर्डी येथील ग.दि. माडगूळकर सभागृहात सुरू असलेल्या प्रशिक्षण सत्राला भेट देत मार्गदर्शन केले. त्यांनी प्रशिक्षणाची प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण कार्यपद्धतीचा आढावा घेतला.

या भेटीदरम्यान उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवारसहा.आयुक्त किरणकुमार मोरेचार्ज अधिकारी तथा क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे आदी उपस्थित होते.

 प्रशिक्षणामध्ये प्रगणकपर्यवेक्षक आणि फील्ड ट्रेनर्स यांना दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनाची सविस्तर माहिती जंगम यांनी घेतली.

प्रशिक्षणाची रचनाविषयांची मांडणी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी याबाबत समाधान व्यक्त करत त्यांनी प्रशिक्षण अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. जनगणनेतील प्रत्येक टप्पा अचूक आणि सुलभ पद्धतीने पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांना आवश्यक ते कौशल्य देण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

विशेषतः घरगुती सर्वेक्षणमाहिती संकलनातील काटेकोरपणानागरिकांशी संवाद कौशल्य आणि डिजिटल साधनांचा वापर या बाबींचे प्रशिक्षण प्रभावीपणे दिले जात असल्याचे त्यांनी पाहिले. ॲप-आधारित डेटा नोंदणी आणि पडताळणी प्रक्रियेमुळे काम अधिक सुलभ आणि पारदर्शक होत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार म्हणाले कीप्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक प्रगणक व पर्यवेक्षकाला प्रत्यक्ष कामासाठी सक्षम केले जात आहे. अचूक माहिती संकलन आणि वेळेवर डेटा सादर करणे हीच या प्रक्रियेची खरी किल्ली असून त्यासाठी आम्ही सर्व पातळ्यांवर काटेकोर नियोजन केले आहे.

या प्रशिक्षणामुळे प्रगणक व पर्यवेक्षक अधिक सक्षम बनत असून आगामी जनगणनेसाठी आवश्यक तयारी बळकट होत आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अचूक लोकसंख्येची माहिती उपलब्ध होण्यास या मोहिमेचा मोठा हातभार लागणार आहे.

जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान होणार असूनत्याअंतर्गत विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तीन दिवसीय प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.

 

कोट :

जनगणना ही शहराच्या नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची आणि मूलभूत प्रक्रिया आहे. शहराच्या पायाभूत सुविधाआरोग्यशिक्षणवाहतूकपाणीपुरवठा यांसारख्या विविध क्षेत्रांतील भविष्यातील नियोजन हे अचूक लोकसंख्येच्या माहितीवरच अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी ओळखून अत्यंत दक्षतेने आणि प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे आहे. जनगणना प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर समन्वयशिस्त आणि वेळेचे पालन राखलेतरच अचूक व विश्वासार्ह माहिती संकलित होऊ शकते. ही केवळ शासकीय जबाबदारी नसून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाने योगदान देण्याची ही एक महत्त्वाची संधी आहे.

-कुलदीप जंगमअतिरिक्त आयुक्तपिंपरी चिंचवड महानगरपालिका

 

कोट:

जनगणना प्रक्रियेत अचूकता आणि वेळेचे नियोजन ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. प्रत्येक प्रगणक व पर्यवेक्षकाने प्रशिक्षणात दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून नागरिकांकडून विश्वसनीय माहिती संकलित करणे आवश्यक आहे. डिजिटल साधनांचा प्रभावी वापरडेटा पडताळणीतील दक्षता आणि नागरिकांशी सकारात्मक संवाद यामुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होईल. योग्य नियोजन आणि समन्वयाच्या बळावर आपण जनगणना प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करू शकतो.

-सचिन पवारउप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारीपिंपरी चिंचवड महानगरपालिका

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.