एस टी महामंडळाची NCMC स्मार्ट कार्ड सेवा सवलतधारी प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती

0 झुंजार झेप न्युज

 एस टी महामंडळाची NCMC स्मार्ट कार्ड सेवा सवलतधारी प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती

सातारा,दि.२६ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ( एसटी) मार्फत विविध प्रवासी सवलतींचा लाभ देण्यात येत असून यासाठी पूर्वी हस्तलिखीत पास दिले जात होते. मात्र आता सवलतधारी प्रवाशांसाठी वार्षिक किलोमीटर मर्यादा व प्रति प्रवास किलोमीटर मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.त्यानुसार सध्या प्रवाशांसाठी NCMC (National Common Mobility Card) सवलत स्मार्ट कार्ड प्रणाली लागू करण्यात आली आहे.
स्मार्ट कार्ड नोंदणी प्रक्रिया सुरु
एसटी महामंडळाने मे. ईबिक्स टेक्नोलॉजी प्रा. लि. आणि एनएसडीएल पेमेंट बँक यांच्या सहकार्याने स्मार्ट कार्ड वितरण सुरू केले आहे. सातारा विभागात बसस्थानकांसह विविध ठिकाणी कंपनीकडून नेमलेल्या खाजगी एजंटांमार्फत नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

कार्ड शुल्क निश्चित

नवीन NCMC सवलत कार्ड नोंदणीसाठी रु. १९९/- इतके शुल्क निश्चित करण्यात आले आहे. या शुल्कामध्ये संपूर्ण प्रकल्प कालावधीतील देखभाल व इतर खर्चांचा समावेश आहे.
प्रवाशांसाठी सूचना
प्रवाशांनी एसटी महामंडळाने निश्चित केलेल्या रु. १९९/- व्यतिरिक्त कोणतीही अतिरिक्त रक्कम देऊ नये. काही एजंटांकडून जास्त शुल्क आकारले जात असल्यास तात्काळ तक्रार नोंदवावी.
तक्रार संपर्क क्रमांक
श्री. सर्वेश घाडगे – 8007861519
श्री. विकास चव्हाण (विभागीय प्रतिनिधी) – 7738087123

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.