कझाकिस्तानमध्ये १०० प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं

0 झुंजार झेप न्युज

कझाकिस्तानमध्ये १०० प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. अल्माटी विमानतळावर टेक ऑफ घेताना जवळ असलेल्या दोन मजली इमारतीवर हे विमान आदळलं. यावेळी विमानात १०० प्रवासी प्रवास करत होते. यापैकी काही प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे. सध्या बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान, या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Plane with 100 people on board crashes in Kazakhstan, emergency services at the site - Almaty airport: Reuters


View image on Twitter

टेक ऑफ दरम्यान या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अल्माटीवरून नूर सुल्तान या ठिकाणी जाताना हे विमान अपघातग्रस्त झालं. रॉयटर्सनुसार या विमानात एकूण ९५ प्रवासी आणि ५ क्रू मेंबर्स होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.