मुंबईत नाईट लाईफ सुरु होणारच; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब

0 झुंजार झेप न्युज

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाइटलाइफच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. 26 जानेवारीपासून अंमलबजावणी होणार आहे. पब आणि बारसाठी नवे नियम नाहीत, पूर्वीप्रमाणेच दीड वाजेपर्यंतची मर्यादा कायम राहणार असल्याचंही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. ते मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. दिवाळी आणि गणपतीच्या सणांच्या वेळी आपण रात्रभर फिरत असतो. नाइटलाइफ सुरू केल्यानं अनेक जण तीन शिफ्टमध्ये काम करतील. महसुलाबरोबरच नोकऱ्यांमध्येही वाढ होणार आहे. आता पोलीसवाले दीड वाजेपर्यंत दुकानं खुली आहेत की बंद याचा आढावा घेत फिरत होते. आता त्या जबाबदारीतून त्यांना मुक्त करायचं असून, त्यांना खरं पोलिसांचं काम करायला देणार आहे. जर कोणत्याही मॉल किंवा कंपनीला वाटलं खासगी सुरक्षा द्यावी, तर तीसुद्धा आम्ही खासगी सुरक्षा पुरवणार आहोत. उत्पादन शुल्काचे कायदे बदललेले नाहीत.

Maharashtra Minister Aaditya Thackeray: Proposal of Mumbai 24x7 has been approved by Cabinet today. From 27th January malls, multiplexes,shops&eateries in non-residential areas like Bandra Kurla Complex&Nariman Point will remain open 24x7. However, we won't impose this on anyone.
View image on Twitter
79 people are talking about this

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.