बहुजन समाज पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त एच.ए.येथे येथील पुतळ्यास पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले.
पिंपरी:बहुजन समाज पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त बसपा महाराष्ट्राचे नेते मा. राहुल ओव्हाळ व पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सूरज गायकवाड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एच. ए. येथील पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.. तसेच पिंपरी येथील महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला देखील बसपा पिंपरी चिंचवड शहर कमिटीच्या वतीने पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी बसपा पुणे जिल्हा सचिव विजयकुमार मिसळे, पुणे जिल्हा सचिव मधुकर इंगळे, पुणे जिल्हा सचिव हरीश डोळस, पुणे जिल्हा संघटन मंत्री सनील कुमार कुट्टी, पिंपरी चिंचवड शहर सचिव राजेंद्र पवार, कार्यालयीन सचिव सूरज बाळासाहेब गायकवाड, पिंपरी विधानसभा अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, राजेंद्र लोंढे, नागेश सदावर्ते, रत्नदीप जावळे, आदी बसपाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते... यावेळी एच. ए. येथिल पुतळ्या जवळ शाहिरी जलशाच्या माध्यमातून शाहीर नरेंद्र सोनटक्के यांनी छत्रपती शिवाजी महाराजाना अभिवादन केले तसेच बसपा महाराष्ट्राचे नेते राहुल ओव्हाळ व बसपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सूरज गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले व समस्त नागरिकांना जयंतीच्या शभेच्छा दिल्या सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर नरेंद्र सोनटक्के यांनी केले व आभार चंद्रकांत सोनवणे यांनी मानले...

