वारंवार कोरोना नियमांचं उल्लंघन, वाशीमधील ‘क्लब नशा’ पब 36 तासात सील

0 झुंजार झेप न्युज

वाशी येथील पाम बीच गॅलरीया मधील क्लब नशा या पबला महापालिकेकडून सील करण्यात आले आहे.

नवी मुंबई : वाशी येथील पाम बीच गॅलरीयामधील क्लब नशा या पबला महापालिकेकडून  सील करण्यात आले आहे. कोरोना काळात सातत्याने नियमांचे उल्लंघन केल्याने या पबवर ही कारवाई करण्यात आली 

या पबमध्ये शनिवार 6 मार्च रोजी सुरु असलेल्या पार्टीत तरुण-तरुणींकडून दारूचं सेवन करण्यात येत होतं. ज्यामध्ये अल्पवयीन मुलेही असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक बस्त आणि एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास रामुगुडे यांनी या पबवर धाड टाकली.

150 ते 200 तरुण-तरुणी ताब्यात

या धाडीत 150 ते 200 तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होत. आढळलेल्या तरुणांना ताब्यात घेऊन पब मालकावर कारवाई करण्यात आली आहे. एका बाजूला नवी मुंबई पोलीस आणि नवी मुंबई महापालिका जीवाचं रान करुन कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला पबमध्ये धांगडधिंगा सुरु होता. त्यांच्याकडून सामाजिक अंतर न पाळणे तसेच मास्क न वापरणे अशा दोन्ही नियमांचे उल्लंघन केले गेले. त्यामुळे एपीएमसी पोलिसांनी कलम 188 नुसार गुन्हा दाखल केला होता. याबाबत पोलिसांनी तुर्भे विभाग अधिकाऱ्यांना पत्रही दिले होते त्याआधारे हा पब सील करण्याची कारवाई करण्यात आली. तर पुढील आदेश येईपर्यंत हा पब बंद राहणार असल्याचेही सांगितले.

नवी मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये

मागील आठवड्यापासून पोलीस आणि महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला असताना देखील पब मालक अशा करवायांना धजावत नसल्याने आता नवी मुंबई पोलिसांनी कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात कोरोनाचे नियम तोडणाऱ्या 500 नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर मास्क न घालणाऱ्या 10 हजार नवी मुंबईकरांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

नवी मुंबई पोलिसांच्या रडारवर आता नियम तोडणारे पब आणि डान्सबार आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळातही पोलिसांकडून अशीच कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.