खेड तालुक्यातील तुकाई भांबुरवाडी गावचे राष्ट्रवादीचे माजी सरपंच व पदाधिकारी यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश!
खेड(खेड प्रतिनिधी बबनराव खेसे) तालुक्यातील तुकाई भांबुरवाडी गावचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा.कार्यध्यक्ष व माजी सरपंच भरत थिगळे, माजी सरपंच काळुराम दरेकर, हरिश्चंद्र वेहळे, स्वप्निल दरेकर, निलेश भांबुरे, माणिक भोसले, विठ्ठल वेहळे, अमोल वेहळे, सुरेश थिगळे यांनी लांडेवाडी, ता. आंबेगाव येथील शिवनेरी निवासस्थानी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या पक्ष प्रवेशावेळी शिवसेना खेड तालुकाप्रमुख रामदास(आबा) धनवटे, पंचायत समिती उपसभापती ज्योती आरगडे, आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष नितिन गोरे, उपतालुका प्रमख केशव अरगडे,चाकण शहरप्रमुख महेश शेवकरी, आपला माणुस जनतेचा सेवक दत्ताभाऊ कंद पाटील, काळुस गावचे माजी सरपंच संदिप पोटवडे, विजय शिंदे पाटील, ग्राहक सरक्षण कक्षाचे शंकर शिंदे, पी डी पाटील, दत्ता टाकळकर, श्रीनाथ लांडे, भानुदास यळवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सर्व मान्यवरांचे शिवसेनेत स्वागत करून पुढील सामाजिक व राजकीय कार्यास शुभेच्छा दिल्या.

