महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांकडून घटनाबाह्यरितीने काम, राजेंद्र गावितांचा आरोप

0 झुंजार झेप न्युज

राजेंद्र गावित यांनी पालघरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी थोरांतावर आरोप केले. 

पालघर : महाराष्ट्रात आदिवासी जमीन बंदी हस्तांतरणाचा कायदा आहे. पण तरीही राज्यात मुंबई, ठाणे, पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणावर आदिवासींच्या जमिनीचे हस्तांतरण बिगर आदिवासींवर होत आहे. या सर्व गोष्टींना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात परवानगी देत आहे, असा आरोप पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी केला आहे.

राजेंद्र गावित यांनी पालघरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी थोरांतावर आरोप केले. आदिवासींच्या ज्या जमिनीची खरेदी विक्री होत आहे. त्याला पूर्णपणे स्थगिती द्यावी. जवळपास हजार प्रकरण आहेत. मुख्यमंत्र्यांना याबाबतचे निवेदन दिले आहे, असे राजेंद्र गावित म्हणाले.

महसूल खात्याकडून सरसकट परवानग्या

“मुंबई, ठाणे, पनवेल भागात जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. त्यामुळे आदिवासी समाजाची जमिनींना मागणी वाढली आहे. महसूल मंत्री थोरात घटनाबाह्यरितीने काम करत आहेत. राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार असताना अशा प्रकारच्या परवानग्या दिल्या जात नव्हत्या.”

“मात्र आता महसूल खात्याकडून सरसकट परवानगी देत असल्याचा आरोप गावित यांनी केला. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या सर्व प्रकरणांची मुख्यमंत्र्यांनी तपासणी करुन योग्य ती करवाई करावी,” अशी मागणी राजेंद्र गावित यांनी केली आहे.

कोण आहेत राजेंद्र गावित ?

राजेंद्र गावित हे आदिवासी नेते म्हणून परिचित आहेत. ते मूळचे नंदुरबार जिल्ह्यातील आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये त्यांनी आदिवासी विकास मंत्री म्हणून काम पाहिले. पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाले आणि 2018 च्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून खासदार म्हणून निवडून आले. 2019मध्ये पालघर लोकसभा क्षेत्र शिवसेनेकडे गेल्यानंतर राजेंद्र गावित हे भाजप सोडून शिवसेनेत दाखल झाले आणि शिवसेनेचे खासदार म्हणून पालघर लोकसभेतून निवडून आले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.