पै.संकेत भाऊ जगताप यांच्याकडून सांगवडे गाव मध्ये जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात
मावळ:मावळ विधानसभा सांगवडे गावामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या मैदानामध्ये गुडघाभर पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून पैलवान संकेत भाऊ जगताप आणि बहुजन समाज पार्टी यांच्या वतीने मुरमाच्या४ गाड्या हायवा म्हणजे २८ ब्रास टाकून तेथील मुलांना आणि मुलींना चांगल्या प्रकारे सहकार्य झाले आणि सामाजिक बांधिलकी म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तत्व प्रणाली प्रमाणे दान पारमिता हे गुण अंगी बाळगून त्यांनी ते काम पूर्ण केले.
या सामाजिक कार्यक्रमाला बहुजन समाज पार्टी नेते मंडळी पुढील प्रमाणे उपस्थित होते.
हमीद भाई कुरेशी, मा. प्रवीण साखरे, मा. मंदाकिनी ताई भोसले, मा. विजयराव ढावरे, मा. महादेव सुर्वे, मा. संकेत भाऊ जगताप, मा. भास्कर भवार, मा. शिरीष रोकडे, मा. डी.एन. धांडोरे, गौतम गंगावणे, गौतम ढावरे व जिल्हा परिषद प्राथमिक प्राथमिक शाळेचे शिक्षक मा. अण्णासाहेब ओहोळ बहुजन समाज पार्टी मान्यवर उपस्थित होते.

