शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रस्तावित ईमारतीसाठी दीड कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव तातडीने पाठवा - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

0 झुंजार झेप न्युज

शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रस्तावित ईमारतीसाठी दीड कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव तातडीने पाठवा - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

जालना : शहरात असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भेट देऊन पहाणी करत आढावा घेतला. यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, सहसंचालक महेश शिवणकर, प्रा.एस.आर. नवले, प्रा. विजयकुमार बुक्का, प्रा. एम.डी. वाघमारे, के.एस. बागवान, उद्योजक सुनिल रायठठ्ठा, भाऊसाहेब घुगे आदींची उपस्थिती होती.

 मंत्री उदय सामंत म्हणाले, शासकीय तंत्रनिकेतनच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदारपणे शिक्षण मिळावे, यासाठी आवश्यक त्या सुविधांसाठी मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. जालना येथे असलेल्या तंत्रनिकेतनच्या ईमारतीसाठी यापुर्वी 3 कोटी 53 लक्ष रुपयांचा निधी देण्यात आलेला असुन विस्तारित ईमारतीसाठी अधिकची आवश्यकता असलेल्या दीड कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव तातडीने पाठविण्यात यावा, त्यास मंजुरी देण्यात येईल. तसेच या तंत्रनिकेतनसाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध नसल्याने औद्योगिक वसाहतीमधुन स्वतंत्र पाईपलाईद्वारे या ठिकाणी पाण्याचा पुरवठा करण्याबरोबरच या परिसरात नव्याने एक विहीरीचे निर्माण करण्याच्या सुचनाही मंत्री महोदयांनी यावेळी उपस्थितांना दिल्या. 

शासकीय तंत्रनिकेतन येथुन शिक्षण घेत विविध पाच उद्योगामध्ये 74 विद्यार्थ्यांची निवड झाल्याने प्रातिनिधिक स्वरुपात इंद्रेश कपाले, प्रगती खरात, संध्या गावडे, अक्षय जंजाळ, शुभांगी शिंदे, संतोष मुंडे या विद्यार्थ्यांचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.