• गांधी स्टाईलने बँक व्यवस्थापकाचा शॉल श्रीफळ देऊन सत्कार
जालना प्रतिनिधी : जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी येथील औरंगाबाद ग्रामीण बँक शाखा व्यवस्थापक सचिन ईरिचे हे गेली दोन वर्षे तिर्थपुरी शाखेत कार्यरत असुन त्यांच्या मनमानी कारभारावरती परिसरातील सर्व म्हणजे कुक्कडगांव, सुखापूरी, लखमापूरी, वडीकाळ्या, बेलगांव, दहेगाव खुर्द, रुई इत्यादी गावचे शेतकरी वैतागून गेले आहे.विशेष म्हणजे वरील सर्व गावं हे औरंगाबाद ग्रामीण बँक शाखा तिर्थापूरी ला दत्तक गावे असून सुद्धा बँक मँनेजर शेतकऱ्यांना कर्ज दिले जात नाही. तर एजंट मार्फतच कर्ज प्रकरण केली जातात. याची दखल घेतली नाही तर. प्रहार सैनिक हे प्रहार केल्या शिवाय राहाणार नाही.
कारण गेली दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना बँकेच्या थेट्या मारत आहे.शेतकरी यांनी शाखेत एजंट मार्फत कर्ज वाटप केले जाते असे. प्रहार जनशक्ती पक्षाचे जालना जिल्हा अध्यक्ष विदुर लाघडे यांच्याकडे तक्रारी गेल्या नुसार त्यांनी सर्व शेतकऱ्यांची दखल घेऊन घनसावंगी चे प्रहार जनशक्ती पक्षाचे घनसावंगी तालुका अध्यक्ष महादेव थुटे व प्रहार जनशक्ती पक्षाचे अंबड तालुकाध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांना सुचना देऊन संबधित शेतकऱ्यांच्या कर्जप्रकरणी समस्या सोडायला सांगितले. महादेव थुटे, राजेंद्र गायकवाड यांनी याची तात्काळ दखल घेतली व बँक व्यवस्थापक यांना आपण या सर्व शेतकऱ्यांना गेली दोन वर्षे बँकेच्या चक्करा मारायला लावल्या बद्दल आज दि 23/6/2021 रोजी गांधी स्टाईल ने दोन वर्षे विलंब केल्या बद्दल मँनेजर चा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व ह्या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरण येत्या आठ दिवसात निकाली नाही काढले तर प्रहार स्टाईल ने ग्रामीण बँक शाखा तिर्थपुरी च्या बँकेला कुलूप ठोकले जाईल असा ईशारा निवेदनातून देण्यात आला. या वेळीअशोक गाढेकर तिर्थापूरी प्रहार विभाग प्रमुख, जना नाना बोबडे प्रहार शहर प्रमुख, अशोक आबा चांगले प्रहार आपंग तालुका उप प्रमुख अंबड, अशोक भोसले प्रहार आपंग शहर प्रमुख तिर्थापूरी, सुभाष राखुंडे प्रहार कामगार जालना, सुनील गाढे ग्रामपंचायत सदस्य लखमापूरी, दादाराव कासार, परमेश्वर महागोविंद, क्रष्णा राक्षे, दिपक गाढे, दत्ता पाटील चव्हाण, संजय मापारी, संदिप जिजा मुकणे, महादेव वानखेडे, अंकुश साबळे, बाबुराव दसरथ, शंकरराव गायकवाड, पवण गायकवाड, संभाजी गायकवाड, सतिश गायकवाड, गणेश राक्षे, धुराजी राक्षे, योगेश डांगे, बाबासाहेब गायकवाड,भगवान बाबर,आकाश गायकवाड, अमोल गायकवाड, इत्यादीच्या सह्या चे निवेदन शाखा व्यवस्थापकांना देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने प्रहार सैनिक व शेतकरी उपस्थित होते.

