गुळाणी ता.खेड या ठिकाणी वाफगांव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले.
गुळाणी ता.खेड (काळूराम घोडके खेड प्रतिनिधी: एकीकडे एकविसाव्या शतकामध्ये जग प्रचंड वेगाने प्रगतीची पाऊले टाकत आहे. तर दुसरीकडे या प्रगतीच्या वेगातूनच निर्माण झालेल्या एका समस्याने संपूर्ण देश हादरून गेला व जगावर कोरोना सारख्या माहामारी रोगाचे भीतीचे सावट निर्माण झाले आहे. येणारी प्रत्येक वादळे ही आपल्याला उध्वस्त करण्यासाठी नसतात. तर आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठी येतात. गुळाणी ता.खेड या ठिकाणी वाफगांव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते आणि लोकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. वाफगांव आरोग्य अधिकारी सुरेश गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक आरोग्य अधिकारी धनंजय लिमजे वाफगांव यांनी लसीकरणाचे नियोजन करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुळाणी या ठिकाणी खेड पोलीस स्टेशनचे बीट अमलंदार साबळे व वडेकर साहेब यांच्या उपस्थितीत व. त्याचप्रमाणे बापूसाहेब थिटे यांनी भेट देऊन लसीकरण करण्यासाठी आल्याल जनसमुदायसी चर्चा केली. त्यावेळी गुळाणी गांवचे ग्रामस्थ व आजी - माजी सरपंच, पोलीस पाटील व अनेक युवा कार्यकर्ते व महिला भगिनीं लसिकरण करण्यासाठी उपस्थित होत्या.

