उत्तर प्रदेशप्रमाणे देशातही लोकसंख्या नियंत्रण कायदा आणावा; देवेंद्र फडणवीसांची मागणी

0 झुंजार झेप न्युज

उत्तर प्रदेशाप्रमाणे देशातही लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची आवश्यकता असल्याचे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

नागपूर : उत्तर प्रदेशाप्रमाणे देशातही लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची आवश्यकता असल्याचे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. ते आज नागपुरात बोलत होते. उत्तर प्रदेशात आता लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची तयारी तेथील राज्य सरकारने केली आहे. या विषयावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ज्या राज्यात लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, त्या राज्यात हा कायदा आणणे आवश्यक आहे. सोबतच गरज पडल्यास देशातही हा कायदा आणणे आवश्यक आहे.

फडणवीस म्हणाले की, गरज पडल्यास देशातही लोकसंख्या नियंत्रण कायदा आणणे आवश्यक आहे, परंतु बळजबरी न करता हा कायदा आणावा. कारण लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणेही गरजेचे आहे. नागपूरच्या प्रगतीत आपले महत्वपूर्ण योगदान देणारे तसेच आपल्या कार्यकर्तुत्वाने नागपूरचे नाव देशभरात गजवणाऱ्या विविध व्यक्तिंच्या पुतळ्यांचे आणि शिलान्यासाचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये मौलाना अब्दुल करीम पारेख, पद्मश्री डॉ. बी. एस. चौबे, लोकनायक बापूजी अणे, विदर्भवीर खा. जांबुवंतराव धोटे, ज्येष्ठ विचारवंत मा. गो. वैद्य, स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्त्यां सुमतीताई सुकळीकर, महान कवी ग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते ए. बी. बर्धन अशा 8 हिरोज ऑफ नागपूरचा यात समावेश आहे. हे सर्व पुतळे आणि शिलान्यास शहरातील मुख्य परिसरातील सिव्हिल लाइन्स येथे रस्त्याचा कडेला उभारण्यात आले आहेत.

देवेंद्र फडणवीसांची नागपूर मनपा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, नागपूरातील भाजप नगरसेवकांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी (10 जुलै) भाजपने नागपुरातील सर्व नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगरसेवकांना निवडणुकीचा कानमंत्र दिला.

नागपूर मनपात गेल्या तीन टर्मपासून भाजपची सत्ता आहे, आगामी मनपा निवडणूक जिंकण्याचीही भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपकडून रणनिती आखली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागपूरातील भाजप नगरसेवकांची एक महत्त्वपूर्ण बैठक आज घेण्यात आली. दरम्यान, आम्ही नागपूर मनपा निवडणुकीच्या कामाला लागलो आहोत, असे माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.